शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

शेताच्या कुंपनावरील जाळे पक्ष्यांकरिता कर्दनकाळ

By admin | Published: January 10, 2017 12:48 AM

मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेले खराब जाळे विकत घेवून ते शेताचे कुंपन म्हणून बांधण्याचा प्रकार

 पाणवठ्यांलगतचा प्रकार : वनविभाग व ईआरसीएस इंडियाचे जाळे निर्मूलन अभियान वर्धा : मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेले खराब जाळे विकत घेवून ते शेताचे कुंपन म्हणून बांधण्याचा प्रकार बोर व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात होत असल्याचे समोर आले आहे. हे जाळे या भागात असलेल्या जलाशयात असलेल्या पाणवठ्यांवर येणाऱ्या पक्षांकरिता कर्दनकाळ ठरत आहे. पारदर्शक व अतिबारीक धाग्यांनी बनलेल्या जाळ्यात अडकून अनेक पक्षांना जीव गमवावा लागल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे शेतातील जाळे काढण्याची मोहीम वनविभाग व ईआरसीएस इंडियाच्यावतीने राबविण्यात आली. ८० ते १०० रुपयात जाळ्यांची खरेदी ४पूर्व विदर्भात अनेक लहान - मोठी धरणे आहेत. जिथे व्यावसायिक मत्स्यमारी केली जाते. या मत्स्यमारीसाठी वापरले जाणारे जाळे काही दिवसात खराब होतात. हे खराब जाळे नजीकचे शेतकरी ८० ते १०० रुपयांत विकत घेतात. हे जाळे शेताच्या धुऱ्यावर बांधून संपूर्ण शेताला वेढल्या जाते. हे जाळे फार बारिक धाग्यांचे बनलेले असते. तसेच जवळपास पारदर्शक भासते व शेकडो पक्षी या जाळ्यामध्ये अडकून मृत्यूमुखी पडत आहेत. यामध्ये बहुतांश वेळी लहान पक्षी अडकतात व त्यांना खाण्यास शिकारी पक्षीदेखील त्यावर झडप घेतात व अडकून मरण पावतात. शेतकरी बांधवांच्या गैरसमजातून अश्याप्रकारचे जाळे लावण्याचा प्रकार घडत असून शेतकऱ्यांचा समस्या समजावून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. वन्यजीवांबद्दल असलेले विविध गैरसमज व अंधश्रद्धा आपल्याकडील वन्यजीव धोक्यात आणण्यास जबाबदार असून समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना केल्यास वन्यजीवांचे संवर्धन शक्य आहे. - संजय इंगळे तिगावकर, सदस्य, सल्लागार समिती, बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन विकासात इतर वन्यजीवांप्रमाणेच पक्ष्यांचाही फार मोठा वाटा आहेत. पर्यटक येथील पक्षीजीवन बघण्यासाठी तसेच अभ्यासण्यासाठी येतात, असे असताना आपल्या परिसरात लावण्यात येणाऱ्या जाळ्यांमुळे पक्ष्यांची निसर्गातील संख्या कमी होत आहेत. अनेक दुर्मीळ पक्षीदेखील या जाळ्यामध्ये मारले जात आहेत. - पराग दांडगे, ईआरसीएस, इंडिया