शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

ग्रामगीता विकासासाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 9:49 PM

ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. ग्रामगीता प्रत्येक गावाच्या विकासाकरिता मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. ग्रामगीता प्रत्येक गावाच्या विकासाकरिता मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.तालुक्यातील अडेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्त सप्तखंजेरी वादक पंकज पाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना खा.तडस बोलत होते. यावेळी खासदार तडस यांच्या स्थानिक विकास निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराज परिसराच्या संरक्षण भिंत व सौदर्यीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लाकार्पण तसेच समाज कल्याण मार्फत दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत समाज मंदिर व रस्त्याचे भूमीपूजन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकर कांबळे तर प्रमुख पाहूणे म्हणून देवळी पंचायत समितीच्या सभापती विद्या भुजाडे, जिल्हा परिषदचे माजी सभापती मिलिंद भेंडे, जि.प. सदस्य विजय आगलावे, माजी जि.प.सदस्य फकीरा खडसे, जिल्हा लहुशक्ती महिला आघाडीच्या अध्यक्ष चेतना कांबळे दिपक फुलकरी, अरविंद झाडे, लहुशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमन बावने, जिल्हा लहुशक्ती अध्यक्ष विलास डोंगरे, दशरथ भुजाडे, सरपंच मारोतराव लोहवे, देवळी तालुका लहुशक्ती अध्यक्ष अशोक डोंगरे, सरपंच गजानन हिवरकर, सरपंच प्रणिता आबंटकर, सरपंच आर्शा भस्मे, सरपंच माधुरी राऊत, सरपंच लता रघाटाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रावबाजी विरपाते, ज्ञानेश्वर वैद्य, रमेशराव खोडे, अमोल खंडार उपस्थित होते.यावेळी गावामध्ये दारुबंदी केल्याबद्दल दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बौद्ध पंच कमेटी महिला सदस्य, लहुशक्ती संघटना सदस्य, गौळ सर्कलमध्ये उत्कृष्ट कार्य करणारी संघटिका छाया चिखलकर यांचा सत्कार करण्यात आला.गावामध्ये वेगवेगळ्या योजनेतून विकास कामे सुरु आहे. गावाचा विकास करायचा असेल तर विकास करणाऱ्या व्यक्तीकडे गावाची सत्ता देणे आवश्यक आहे, असे मत पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे यांनी व्यक्त केले. यावेळी मिलिंद भेंडे यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केलेत. जि.प.सदस्य विजय आगलावे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर हे पवित्र स्थान आहे. या परिसराचे सौदर्यीकरण व पावित्र्य टिकून ठेवण्याकरिता सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. लोकशाहीर अण्णभाऊ साठे यांचे साहित्य हे अनमोल आहे त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रातील कष्टकरी, सामान्य नागरिकांना जागवण्याचे कार्य केले, असे मत मधुकर कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. यानंतर सप्तखंजेरी वादक पंकज पाल महाराज यांचा विनोदी समाज प्रबोधन कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.