आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. यावर सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून आणखी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्प शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे माघारी गेला आहे. प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमीनीचे मुल्यांकन करून पूर्ण अनुदान देणे अपेक्षित होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्पबाधित व्यक्तीला शासनसेवेत नोकरीचा लाभही नाही. प्रकल्पामधून ३५०० हेक्टरवर सिंचनाची व्यवस्था अपेक्षित होती; मात्र कालव्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडून आहे.मुख्य कालव्याचे तोंड बांधण्यात आले. उर्वरित अस्तरीकरण झाले नाही. सध्या कालव्यांना गवत, झाड झुडूपानी वेढा घातला आहे. याच कालव्यामधून शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याने मुळ रस्ताही हरविला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या तोंडावरचा भाग मोकळा केला नाही. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यापूर्वीच सदरचा भाग झाकला असल्याचे दिसत आहे. सुसुंद्रा, माणीकवाडा, कोल्हाकाळी, तारासावंगा, साहूर, जामगाव या मौजा मधील ३५०० जमीन ओलिताअभावी पडून आहे.कार प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्पाबाबत माहिती देत नाही. शासनाकडून निधी येईल तेव्हा काम करू, अशी मोघम उत्तरे देवून वेळ मारून नेत आहे. शेतकºयांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्या जाते; मात्र वर्षानुवर्षे सदरचे आश्वासन हवेतच विरत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला मार्गी लावून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी कार प्रकल्पातील शेतकºयांनी केली आहे.
१५ कोटी खर्चूनही कार प्रकल्प अर्धाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:46 AM
शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.
ठळक मुद्देशेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत