शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

पाणीदार गावासाठी सरसावले हात

By admin | Published: May 05, 2017 1:58 AM

पाणी फाऊंडेशनद्वारे घेण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये सध्या श्रमदानाची जणू होडच लागली आहे.

महिलांकडून अल्पोपहाराची व्यवस्था : आबालवृद्धही मदतीला पिंपळखुटा : पाणी फाऊंडेशनद्वारे घेण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये सध्या श्रमदानाची जणू होडच लागली आहे. प्रत्येक हात गाव पाणीदार करण्यासाठी झटू लागला आहे. गावात जलमोहीम सुरू झाली असून विविध कामे प्रगतिपथावर आहेत. पाणीदार गावासाठी ग्रामस्थांनी कामाला वेग दिला आहे. दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष सूमन उईके या श्रमदात्यांच्या अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त दिसतात. मजुरी करून पोट भरणाऱ्या कल्पना उईके या देखील न्याहारीची व्यवस्था करून श्रमदात्यांचा उत्साह वाढवित आहेत. १५ दिवसांत श्रमदान करणाऱ्या हातांची संख्या वाढत आहे. गावात शोषखड्डे, नाला सरळीकरण, वनराई बंधारा, वृक्षारोपण खड्डे, विहीर दुरूस्ती, माती परिक्षण व उताराला पाणी अडविणारे आडवे चार खड्डे आदी कामे पूर्ण झालीत. श्रमदात्यांमध्ये सर्वच नागरिक सहभागी होत आहेत. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत नित्यनेमाने श्रमदात्यांचे हात राबत असून गाव पाणीदार करण्याची मोहीम जोर पकडत आहे.(वार्ताहर)