शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

शाळेतील तेल, चणा घरी नेणारी मुख्याध्यापिका गावकऱ्यांच्या हाती

By admin | Published: April 02, 2016 2:34 AM

विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शालेय पोषण आहारातील तेल व चना खुद्द मुख्याध्यापिका घरी नेत असल्याचा प्रकार ...

शालेय पोषण आहार घरी : शिक्षण समितीने पकडले रंगेहात समुद्रपूर : विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शालेय पोषण आहारातील तेल व चना खुद्द मुख्याध्यापिका घरी नेत असल्याचा प्रकार तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील उच्च प्राथमिक शाळेत उघड झाला. शालेय पोषण आहाराच्या वस्तू घरी नेणाऱ्या या मुख्याध्यापिकेला शिक्षण समितीच्या सदस्यांनी रंगेहात पकडले. चंद्रकला वरघणे असे या मुख्याध्यापिकेचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघड झाला.जिल्हा परिषदेच्या शाळेत येत असलेल्या चिमुकल्यांना पोषण आहार देण्याची योजना शासनाने अंमलात आणली. ही योजना अंमलात आली त्याच काळापासून ती चर्चेत राहिली. कधी तांदळाचा घोळ तर आता योजनेतील साहित्य घरी नेण्याचा प्रकार उघड झाला आहे. वायगाव (हळद्या) येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला वरघणे या शाळेतील पोषण आहाराचे साहित्य घरी नेत असल्याची पुसटशी कल्पना शिक्षण समितीच्या सदस्यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी शिक्षण समिती व गावकऱ्यांनी सापळा रचून मुख्याध्यापिकेला सोयाबीन तेल व अर्धा किलो चना या वस्तूंसह शाळेच्या बाहेर वासुदेव पाटील यांच्या घरासमोर रंगेहात पकडले.मुख्याध्यापिका वरघणे या सुट्टी झाल्यानंतर सर्व शिक्षक गेल्यानंतर घरी जायच्या. त्यांच्याकडून हा प्रकार गत दोन वर्षांपासून सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापिकेला पकडल्यानंतर शिक्षण समिती सदस्यांनी तहसीलदार सचिन यादव यांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद, विस्तार अधिकारी हेडाऊ व केंद्रप्रमुख नाशीरकर शाळेत दाखल झाले. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे बयान नोंदवून घेतले. सोबतच शालेय पोषण आहाराचा अहवाल सील करण्यात आला आहे. धान्यसाठा असलेली खोली सुद्धा सील केली. शनिवारी शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड व उपलब्ध धान्य साठा तपासण्यात येईल. यानंतर सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद यांनी सांगितले. वरघणे यांच्या पिशवित सापडलेले खाद्य तेल व चना सील करून जप्त करण्यात आला. यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश दळणे, ग्रा.पं. सदस्य सुनिता घुमडे, सचिन घुमडे, महेंद्र भोले, माजी सरपंच किशोर घुमडे, प्रभाकर घुमडे, प्रदीप मोगरे, अनिल भूरे, विठ्ठल घुमडे व गावकरी उपस्थित होते. सदर विषय पंचायत समितीच्या आजच्या सभेत चर्चेत घेण्यात आला. तसेच कारवाईच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली.(शहर/तालुका प्रतिनिधी) पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा या प्रकाराची माहिती होताच येथील पंचायत समितीत आयोजित असलेल्या मासिक सभेत यावर चर्चा करण्यात आली. सर्वच सदस्यांनी या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला. शिवाय या प्रकरणी कारवाई करण्याबाबत चर्चा करीत सदर विषय सभेच्या इतिवृत्तात समाविष्ट केला.