लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मीच्या वतीने धडक मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के, जिल्हासंघटक आशिष मेश्राम यांनी केले.यावेळी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात काही दिवसांपूर्वी जम्मु-काश्मिरमधील कठूवा, उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे बलात्काराच्या घटना घडल्या. याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटंूबीयांना योग्य न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या देशभरात बलात्कार, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असून सरकार गुन्हेगारांची पाठराखण करीत असल्याबाबत निषेध नोंदवत या अमानवी घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.वर्धेकरांनीही नोंदविला निषेधवर्धा : आसिफा तसेच उन्नव येथील पीडितेवरील अन्यायाबाबतचा जनसामान्यांचा आक्रोश शासन दरबारी पोचविण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.सरकारला पाठविण्यात आलेल्या निवेदनात, जम्मु येथील आसिफा या ८ वर्षीय बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या करणाºयांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. शासन गुन्हेगारांच्या पाठीशी उभे आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत देशात संविधानात्मक कायद्याची आणि मानवी हिताची शासनव्यवस्था निर्माण व्हावी व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.यावेळी आधार सामाजिक संघटनेचे प्रा.भास्कर इथापे, आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, धरामित्रचे डॉ. तारक काटे, ग्रामसेवा मंडळाच्या करुणा फुटाणे, मार्च फॉर सायन्सचे प्रा. अतुल शर्मा, अध्ययन भारतीचे हरिष इथापे, निर्माण फाउंडेशनचे अमीर अली अजानी, महिला लोक आयोगाच्या सुचिता ठाकरे, रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या संगीता इंगळे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे पंकज वंजारे, जिजाऊ ब्रिगेडच्या माया पवार, संभाजी ब्रिगेडचे मयुर डफळे, राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, सुभाष कांबळे, युवासोशल फोरमचे सुधीर पांगूळ, सलीम कुरेशी, किरण पटेवार, संजय पवार, विक्रम खडसे, स्वाती सगरे, भाग्यश्री बकाले, आरती नेटके, शशिकांत जावळेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
बलात्काऱ्यांना फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:53 PM
जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली.
ठळक मुद्देभीम आर्मीची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा