शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हर हर महादेवचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:05 PM

महाशिवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी अनेक शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिव चरणी माथा टेकविला. या प्रसंगी भाविकांनी सुख, समृद्धी आणि विश्वशांतीसाठी ईश्वराला साकडेच घातले. सोमवारी वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटे ५ वाजेपासून एकच गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम होती.

ठळक मुद्देभाविक झाले नतमस्तक : सुख-समृद्धीसह विश्वशांतीसाठी घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाशिवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी अनेक शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिव चरणी माथा टेकविला. या प्रसंगी भाविकांनी सुख, समृद्धी आणि विश्वशांतीसाठी ईश्वराला साकडेच घातले. सोमवारी वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटे ५ वाजेपासून एकच गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम होती.वर्धा शहरातील महादेवपुरा भागात प्राचिन शिव मंदिर आहे. हे मंदिर वर्धा शहरासह शहराबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे नेहमीच भाविक दर्शनासाठी येतात. शिवाय श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांचा मळा फुलतो. या मंदिरात मोठे शिवलिंग असून शिवचरणी नतमस्तक होणारे अनेक भाविक नवसाचा संकल्प सोडतात.मंदिराच्या आवारात विहीर असून एक मोठे आणि फार जूने पिंपळाचे वृक्ष आहे. मंदिरात येणारे नागरिक शिवचरणी नतमस्तक होण्यासह या पिंपळाच्या वृक्षाच्या शेजारी देवी-देवतांच्या मूर्ती असल्याने त्यांचेही मनोभावे पूजन करतात.सोमवारी पहाटे ५ वाजता आरती झाल्यापासून शिवभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी सायंकाळी उशीरापर्यंत कायम होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वर्धा शहर पोलिसांच्यावतीने येथे बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती.भक्तिमय वातावरणाची निर्मितीमहादेवपुरा भागातील शिव मंदिरात सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. दर्शनासाठी येथे भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. रांगेत उभे राहून दर्शनाच्या प्रतीक्षेत असेले भाविक राहून राहून ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत होते. एकूणच महादेव मंदिर परिसरात आज भाविकांच्या उत्साहामुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती.अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी दिला खडा पहारामहाशिवरात्रीचे औचित्य साधून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊ नये यासाठी शहर पोलीस स्टेशनच्यावतीने एक अधिकारी व १० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती महादेवपुरा भागातील महादेव मंदिराच्या आवारात करण्यात आली होती.दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आपल्या चमूसह शिव मंदिर गाठून येथील सुरक्षेचा आढावा घेतला. येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीही विशेष प्रयत्न केले.