शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विरूळ येथे आरोग्य चमू दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:24 PM

येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरमठोक यांच्या चमुने विरूळ गाव गाठून मृतकाच्या कुटुंबियांकडे बालिकेच्या मृत्यूची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देबालिकेच्या मृत्यूचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरमठोक यांच्या चमुने विरूळ गाव गाठून मृतकाच्या कुटुंबियांकडे बालिकेच्या मृत्यूची माहिती जाणून घेतली.पठाडे यांच्या कुटुंबियांशी यावेळी सदर चमुतील अधिकाऱ्यांनी विविध विषयी चर्चा केली. तसेच गावात कुणी आजारी व्यक्ती आहेत काय? याचीही माहिती आरोग्य विभागाच्या चमुने जाणून घेतली. यावेळी प्रत्येक घरी जाऊन आजारी व्यक्तीबाबत माहिती घ्या, अशा सुचना आरोग्य कर्मचाºयांना केल्या. तसेच गावातील पाण्याचे नमुनेही घेतले. गावात कुठे पाणी साचून आहेत काय, याबाबत माहिती जाणली. तसेच लवकरच गावात धुळफवारणी करण्यात येईल, अशी माहिती डॉ. गहलोत लोकमतशी बोलताना दिली. आरोग्य विभागाचे विरूळच्या या घटनेकडे पूर्ण लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.गत वर्षी विरूळ गावात डेग्यूच्या आजाराने सचिन देवतळे यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. यागावात स्वच्छतेकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष असल्याने दरवर्षी डेग्यू व सदृष्य आजाराने अनेक लोक आजारी पडतात. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागतो. स्वच्छतेकडे ग्रा. पं. ने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.