शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

उन्ह तापताच कुलर दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:16 PM

साधारण होळी सणानंतर उन्ह तळपण्यास सुरुवात होते; पण आता फेबु्रवारी महिन्यातच कडक उन्ह तापू लागले आहे. सध्या पारा ३९-४० अंशांवर गेला असून तो वाढतीवरच राहणार आहे.

ठळक मुद्देपारा वाढतोय : फायबरच्या हलक्या कुलरला ग्राहकांची पसंती

ऑनलाईन लोकमतवर्धा : साधारण होळी सणानंतर उन्ह तळपण्यास सुरुवात होते; पण आता फेबु्रवारी महिन्यातच कडक उन्ह तापू लागले आहे. सध्या पारा ३९-४० अंशांवर गेला असून तो वाढतीवरच राहणार आहे. यामुळे आतापासूनच घरोघरी कुलर लावण्याला वेग आला आहे. तसेच शहरात सर्वत्र कुलर दुरुस्ती व विक्रीची दुकाने दिसत आहे. सोबतच कुलरसाठी लागणारा वाळाही विक्रीस आला आहे.सध्या उकाडा जाणवण्यास प्रारंभ झाला आहे. दुपारी फॅनच्या हवेत घरी राहणे असह्य होऊ लागले आहे. यामुळे सुटीच्या दिवशी जो-तो ठेवलेला कुलर काढून तो बसविण्याची धडपड करीत असल्याचे दिसते. यंदा जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस आला नाही. उकाडाही लवकरच जाणवायला लागला. यामुळे मार्चच्या उत्तरार्धात वा एप्रिल महिन्यात बाहेर निघणारे आता फेबु्रवारीचा उत्तरार्ध तथा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काढण्याची कामे सुरू झाली आहे. कुलरच्या किमती दरवर्षीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करताना दिसतात. शिवाय अनेक जण स्वस्तातील एसी घेण्यासही पसंती देत असल्याचे दिसून येते. हकल्या फायबरच्या कुलरलाही पसंती मिळताना दिसते.वर्षभर अडगळीत पडून राहिल्याने बिघाडपावसाळा सुरू झाला की कुलरची त्या वर्षापूरती गरज संपते. अशावेळी तो कुलर पूर्णपणे मोकळा करून व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते; पण अनेक जण कुलर अडगळीत तसास ठेवून देतात. परिणामी, उन्हाळ्यात कुलर सुरू करण्याची वेळ आली की त्यामध्ये हमखास बिघाड येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. अनेकदा तर त्याचे नट गंजल्याचे दुरुस्ती करणेही कठीण जाते. त्यामुळे नागरिकांना दुरुस्तीच्या ठिकाणी नेऊन कुलर दुरुस्त करून घ्यावा लागतो. नवीन वाळा टाकणे अनेकांना जमत नाही. त्यामुळे ते देखील वाळा टाकण्यासाठी कुलर दुकानांमध्ये घेऊन जाताना दिसतात. परिणामी, सध्या शहरात अनेक ठिकाणी कुलर दुरुस्तीची लगबग सुरू असल्याचे दिसते.अनेकांना मिळतोय रोजगारअनेकांच्या कुलरमधील मोटरमध्ये बिघाड येतो. तसेच इलेक्ट्रिक फिटिंगही करावी लागते. यासाठी कारागिरांची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करीत असलेल्या कारागिरांना चांगला रोजगार मिळतो. शिवाय कुलरचे टबही जंगत असल्याने ते खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा अधिक असतो. यामुळे टब बनविण्याच्या रोजगारातही वाढ होत असल्याचे दिसून येते.

लाईट वेट कुलरला मागणीहलके व आकर्षक असे फायबरचे कुलर घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. कमी पाण्यात अधिक वेळ परिसर थंड करण्याची क्षमता या कुलरमध्ये असते. यामुळे त्यांना पसंती मिळत आहे. अनेकांच्या घरी बाहेरून कुलर लावायला जागा नसते. अशा वेळी असे कुलर घरात लावता येत असल्याने सोयीस्कर ठरतात. ते एका जागेवरू न दुसरीकडे सहज हलविता येतात. सोयीच्या दृष्टीने असे कुलर घेतले जात आहेत.एसीची मागणीही वाढलीआधी एसी हा शब्द जरी उच्चारला तरी तो किती महाग आहे, असा विचार नागरिकांच्या मनात डोकावत होता. शिवाय उन्हाळ्यात वाढीव वीज बिलाचा आधीच नागरिक धसका घेत असत; पण काही वर्षांत तांत्रिक वस्तूंच्या किमती झपाट्याने कमी झाल्या आहेत. नवनवीन कंपन्या अत्यल्प व्याजदरात किस्तीवर एसीसारख्या वस्तू देत असल्याने नागरिकांचा एसी घेण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.खोल्यांवर कुलर लावण्याची लगबगशहरात बाहेर गावाहून शिकायला येत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. अनेक विद्यार्थी भाडेतत्त्वावर खोली करून एकत्र राहतात. मार्च, एप्रिल व मे हे तीनही महिने परीक्षांचे असतात. अशावेळी गर्मीत अभ्यास करणे असह्य होते. यामुळे विद्यार्थ्यांची खोल्यांवर कुलर लावण्याची घाई असते. यंदा फेबु्रवारीतच विद्यार्थी कुलर बाहेर काढताना दिसून येत आहेत.