लोकमत न्यूज नेटवर्कपिपरी (पोहणा) : गुरांना चारा आणण्याकरिता शेतात गेलेल्या व्यक्तीवर रानडुकराने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना पिपरी येथे घडली असून शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे.मोरेश्वर मारोतराव चतुरकर असे जखमीचे नाव आहे. ते लहान व्यावसायिक असून घरी असलेल्या जनावरांकरिता चारा आणण्यासाठी जांगोना रस्त्याने जात होते. या दरम्यान रत्नाकर देशपांडे यांच्या शेताजवळ दडून असलेल्या रानडुकराने मोरेश्वर चतुरकर यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना आता कोणतेही काम करता येत नाही. त्यांच्या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालत होता. परंतु आता व्यवसायही ठप्प पडल्याने कुटुबांचा उदर्निवाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. गावात सध्या जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या जंगली श्वापदांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:06 PM
गुरांना चारा आणण्याकरिता शेतात गेलेल्या व्यक्तीवर रानडुकराने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना पिपरी येथे घडली असून शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देमदतीची मागणी: परिवारही अडचणीत