शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

नगराध्यक्षासह मुख्याधिकारी पोहोचले उपोषण मंडपात

By admin | Published: September 24, 2016 2:12 AM

नगर पालिकेच्या रस्त्यांवर असलेले प्लास्टिक खाल्ल्यामुळे एकूण १७ जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप

उपोषण सुरूच : मंडपात गावकऱ्यांची गर्दी सिंदी (रेल्वे) : नगर पालिकेच्या रस्त्यांवर असलेले प्लास्टिक खाल्ल्यामुळे एकूण १७ जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत चंद्रशेखर बेलखोडे याने दोन दिवसांपासून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेत नगराध्यक्ष सुनिता कलोडे, उपाध्यक्ष अशोक कलोडे व मुख्याधिकारी रवींद्र ढाके यांनी शुक्रवारी उपोषणकर्त्याची भेट घेतली. यावेळी पालिकेने उपोषण सोडविण्याऐवजी उपोषणकर्त्याला उपोषण नियमबाह्य असल्याचे पत्र दिले. यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या उपोषणाची माहिती तालुक्यात पसरत असून येथे अनेकांकडून भेटी देणे सुरू झाले आहे. शुक्रवारी उपोषण मंडपाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, पालिकेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, नगरसेवक रामअवतार तूरकयाल, सुधाकर वल्केयांनी भेट देत चर्चा केली. चंद्रशेखर याने गुरुवारपासून पालिकेसमोर जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण तोडग्याऐवजी कारवाईचे पत्र सिंदी(रेल्वे) : पालिकेच्यावतीने उपोषकर्त्याला दिलेल्या पत्रानुसार आपले उपोषण नियमबाह्य आहे, आपण आपल्या सोबत गाई व वासरू उपोषणस्थळी उभे केले आहे. त्यामुळे पालिकामध्ये येणाऱ्यांना व शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना अडचण होत असल्याने आपण आपले उपोषण मागे घ्यावे. यातून कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. सदर उपोषण सोडविण्याबाबत तोडगा काढण्याऐवजी पालिका प्रशासनाने असे पत्र देऊन बेरोजगार युवकाच्या जखमेवर मीठ चोळण्याची चर्चा पालिकेच्या अवारात आहे. त्यामुळे न.प. प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरूद्ध जनमाणसात संतापाची भावना आहे. विजय जयस्वाल यांनी मृत गायींची नुकसान भरपाई मिळवून व दोषीवर कार्यवाही करण्यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन यावेळी दिले. या उपोषणस्थळी मोठ्या संख्येने गावकऱ्यांचा पाठींबा मिळत असून उपोषण स्थळी शेकडो संख्येने गावातील नागरिकांचे लोढेंचे लोंढे भेटी देण्यास येत आहे. शुक्रवारी या मंडपाला यांनी भेट दिली.(वार्ताहर)