शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

By अभिनय खोपडे | Published: October 27, 2023 4:07 PM

वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर  तिसऱ्या दिवशी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा  भ़जन आंदोलन केले.

वर्धा :  राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबर पासून आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी बेमुदत कामबंद केल्या मुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात ३५ हजार आरोग्य विभागातील विविध संवर्गातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद करून संपात सहभागी  झाले असल्यामुळे राज्यभर आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाले आहे.

वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर  तिसऱ्या दिवशी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा  भ़जन आंदोलन केले. मागील  वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत महाराष्ट्रातील आरोग्य विभागात हजारो पदरिक्त आहेतम्हणून महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची धुरा ही कंत्राटी कर्मचाऱ्यावर आहे.

ओरिसा राजस्थान पंजाब मणिपूर मेघालय  झारखंड  आंध्रप्रदेश या राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध विभागातील रिक्त पदावर सामावून घेण्यात आलेले आहे तर मध्यप्रदेश येथे त्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे अनेक वर्षापासून महाराष्ट्रात ही मागणी असताना महाराष्ट्र सरकारने अजूनही विचार केलेला नाही याबाबत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने अनेकदा आंदोलन केलेत चार वेळा मंत्रालयात आरोग्य मंत्री यांच्यासोबत चर्चा झाली.

आरोग्य मंत्री यांनी सरकार सकारात्मक आहे ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झाली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सामावून घेण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्ते  व. विधानसभेच्या बजेट सत्रात सरकारकडून देण्यात आले परंतु अजून पर्यंत कुठलाही  धोरणात्मक निर्णय घेतलेला नसल्यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यात एक नैराश्य निर्माण झालेली आहे त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी कृती समिती  निर्माण करुन समायोजनाच्या मागणीसाठी बेमुदत संप २५ ऑक्टोबरपासून सुरू केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी समायोजन. कृती समिती मुख्य मार्गदर्शक दिलीप उटाणे, प्रवीण बोरकर मुख्य समन्वयक पवन वासनिक, कोरोना काळात याच कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःची परवा न करता काम केलेले आहे त्यामुळेच कोरोना सारखा संकट थांबवू शकलो महाराष्ट्र सरकारने तत्काळ समायोजनाबाबत कार्यवाही करून व धोरणात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी  विनंती आयटक व कृती ने सरकारला  केली आहे .

टॅग्स :wardha-acवर्धा