वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठातील बीएड व एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या देत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याच आंदोलनादरम्यान शनिवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यां तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालविल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात शिक्षा विभागाच्यावतीने बीएड व एमएड (एकीकृत) अभ्यासक्रम चालविल्या जातो. मागील चार वर्षांपासून बीएड अभ्यासक्रम येथे सुरू असून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि यूजीसी नेटच्या परीक्षेकरिता या विद्यापीठाचे नाव येत नाही. शिवाय बीएड व एमएड अभ्यासक्रम देशातील इतर राज्यांमधील विद्यापीठांशी हे विद्यापीठ सलग्न नाही. यामुळे याचा शैक्षणिक फटका हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याच्या मुख्य मागणीसाठी ४ मार्चपासून बीएड आणि एमएडचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे ८० विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यांपैकी प्रथम शिवदत्त द्विवेदी, द्वितीया रत्ना व नितू सोनकर यांची प्रकृती खालविल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची समस्या तात्काळ निकाली काढण्यात यावी, अशी मागणी अभय सिंह, दीपककुमार सिंह, अमितकुमार, नंदन चंद्रपाणी, रोहीत पटेल, रवी आर्य, आशुतोष उपाध्याय, चंदन कुमार आदींनी केली आहे.
तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:15 AM
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठातील बीएड व एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या देत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याच आंदोलनादरम्यान शनिवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यां तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालविल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देहिंदी विद्यापीठातील प्रकार : विविध मागण्यांसाठी आंदोलन