लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जिल्हा आरोग्याधिकारी व देवळीचे तालुका आरोग्याधिकारी यांना काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, या प्रकरणी रणजित कांबळे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर, गिरड, मांडगाव, निंबा, जाम, कोरा, नारायणपूर येथील आरोग्य केंद्रांतील कर्मचारी, अधिकारी यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. या आंदोलनात तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुनील भगत, डॉ. नीता चन्ने,जाम, डॉ. रितेश चन्ने वायगाव (हळद्या), डॉ सागर बोंबले- परडा, डॉ. हर्षदा नागपुरे, उब्दा, डॉ, प्राची पांडे, शेडगाव, डॉ. सोनाली दुधार, कोरा, डॉ. अजय भुजाडे, वायगाव गोंड, डॉ. वैशाली थेरकर, निंभा, डॉ. विशाखा बनकर, नारायणपूर, डॉ. पंकज पावडे, डॉ. तृप्ती येनूरकर, नंदोरी, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. गुजर, डॉ. मुन गिरड, डॉ. चेतन आडे, धोंडगाव, आदींसह आरोग्य विभागातील कर्मचारी मेकला, खडतकर, वाघमारे, नगराळे, रोडे, राऊत, झामरे व आरोग्यसेवक, आरोग्यसेविका सहभागी झाले होते. जिल्हास्तरावर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आमदाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 5:00 AM
जिल्हा आरोग्याधिकारी व देवळीचे तालुका आरोग्याधिकारी यांना काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, या प्रकरणी रणजित कांबळे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना शिवीगाळीचे प्रकरण : गुन्ह्यात वाढ करून अटक करण्याची मागणी