शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 5:00 AM

हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सकाळी एक मजकूर जाहीर करीत विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची कशी स्थिती राहील याबाबतची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात ५६४.१७ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर मध्यंतरी जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी झाल्याने मोसमी पाऊस आला, असा अंदाज बांधत तब्बल ४२ हजार ६९४ हेक्टरवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. तर आता पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

सप्टेंबरपर्यंत पडतो ६६७०.८४ मिमी पाऊस- वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी सुमारे ६६७०.८४ मिमी पाऊस पडतो. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५६४.१७ मिमी इतकाच पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तर आता पुढील पाच दिवस जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याने अंकुरलेले पीक करपण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अन्यथा दुबार पेरणीचे ओढवणार संकट- जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पीकही अंकुरले आहे. पण अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास पेरणीची लगीनघाई करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटच ओढवणार आहे.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उभ्या पिकांना ठिबक किंवा तुषारने सिंचन करावे. शिवाय पिकाला डवरणी करावी. तसेच कुठली अडचण येत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊस