शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

हिंगणघाट येथे एसडीओ कार्यालयासमोर धरणे

By admin | Published: January 10, 2017 12:56 AM

नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध नोंदविण्याकरिता येथे राष्ट्रवादी काँगे्रसच्या

नोटाबंदीचा विरोध : विविध मागण्यांचे निवेदन सादर हिंगणघाट : नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध नोंदविण्याकरिता येथे राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदनामध्ये नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. सोतबच मायक्रोफॉयनान्सचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात माजी आमदार राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.(तालुका प्रतिनिधी) वर्धेतही निषेध आंदोलन ४वर्धा - या निषेध धरणे आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, डॉ. किशोर अहेर, पं.स. उपसभापती संदेश किटे, नगरसेवक मुन्ना झाडे, विजयसिंह गुलाबसिंह बघेल, बाबुजी ढगे, लक्ष्मीकांत सोनवणे, प्रदीप मेघे, विद्या सोनटक्के, शारदा केने, पिपरी (मेघे) येथील सरपंच कुमूद लाजूरकर, ग्रा.पं. सदस्य अजय गौळकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा ४वर्धा - महिला काँग्रेसच्या आंदोलकांकडून उपजिल्हधिकारी लोणकर यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी महिलांकडूून माहितीही जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना त्या समस्यांवर चर्चाही करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या वरिष्ठांकडे सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा पुष्पा नागपुरे तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी उषा उताने उपस्थित होत्या. तसेच वर्धा जिल्हा महिला कॉँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष विभा ढगे, सुरेखा किटे, कुंदा भोयर, रंजना पवार, निलीमा दंडारी, रोशना जानळेकर, मंगला इंगळे, लढी, अर्चना मून, राजश्री देशमुख, गायधने, शालू इवनाथे, पुष्पा लांबट, प्रमीला भूसारी, प्रभा जाधव, निलीमा दंडारे, रेखा भगत व मोठ्या संख्येने कॉँग्रेस कमिटीच्या महिला उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)