शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

हेल्मेटची सक्ती असावी; पण लहान शहरांत शिथिलता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:34 PM

सध्या हेल्मेट हा लोकचर्चेचा विषय ठरला आहे. शासनाने यापूर्वीही अनेकदा हेल्मेटच्या सक्तीचा निर्णय घेतला आणि तो परत फिरविला.

ठळक मुद्देलहान-मोठी शहरे तथा ग्रामीण नागरिकांचा सूर : दुचाकी चालकांवर पडणार अधिकचा भुर्दंड,

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या हेल्मेट हा लोकचर्चेचा विषय ठरला आहे. शासनाने यापूर्वीही अनेकदा हेल्मेटच्या सक्तीचा निर्णय घेतला आणि तो परत फिरविला. यामुळे अंमलबजावणी दूरच होती. आता पुन्हा हेल्मेट सक्त्ीचा विषय चर्चिला जात आहे. अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. हेल्मेटची सक्ती असावी, यावर कुणाचा आक्षेप नाही; पण लहान शहरे, गावांत हेल्मेटची अकारण सक्ती करू नये, अशी मागणी समोर येत आहे.अपघात झाल्यास हेल्मेट डोक्याचा बचाव करण्यात मोलाची भूमिका बजावले. यामुळे ही गरज आहे. त्याची अंमलबजावणीही गरजेची आहे. यामुळे एक चांगली सवय दुचाकी चालकांना लागणार असून अनेकांचे प्राण वाचणार आहे; पण ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असून लहान-लहान गावे आहेत. लहान शहरेही आहेत. या ठिकाणी अगदी थोड्या -थोड्या अंतरावर ये-जा करावी लागते. लहान शहरांत हेल्मेटचे ओझे अनेकदा व्यवहार्य ठरत नाही. उलट ते त्रासाचे ठणार आहे. यामुळे लहान गावांना हेल्मेटची सक्ती अधिक जाचक ठरणारी आहे. यामुळे यावर वेगळा विचार करण्याची गरज असून तत्सम मागणीही नागरिकांसह संघटनांकडून केली जात आहे.सक्तीतून अंतर्गत वाहतूक वगळण्याची मागणीशहरातील वस्ती लहान असल्याने प्रत्येक वेळी हेल्मेट वापरणे शक्य नाही. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीसाठी हेल्मेटची सक्ती नसावी. लहान शहरांत वावरणाऱ्या दुचाकींना हेल्मेटची सक्ती शिथिल करावी, अशी मागणी अनेक युवकांनी केली आहे. हिंगणघाट हे शहर साधारणत: आठ किमीच्या परिघात वसले आहे. शहराचा आवाका चार किमीच्या आत असल्याने दैनंदिन कामांसाठी शहरात ये-जा करावी लागते. थोड्या अंतरावर अनेक कामे पार पडतात. घरगुती साहित्याची खरेदी, दैनंदिन लागणाºया वस्तू, भाजीपाला, रुग्णांना दवाखान्यात नेणे-आणणे, नातलगांच्या घरी भेट देणे, कार्यालयीन संपर्क आदींसाठी थोड्या अंतरावर जावे लागते. आता हेल्मेट वापरण्याची सक्त्ी होत आहे. हेल्मेटसोबत घेऊन फिरणे, ते सांभाळणे याकडे लक्ष देणे आदी नवीन जबाबदाºयांमुळे नागरिक अडचणीत आले आहेत. महिलांना ही बाब अधिक त्रासदायक ठरत आहे. यामुळे बहुतांश नागरिक हेल्मेटचा विरोध करतानाच दिसून येत आहेत.सर्वत्र रंगताहेत हेल्मेटच्या चर्चासध्या सर्वत्र हेल्मेटच्या चर्चा वेगवेगळ्या अर्थाने रंगत असल्याचे दिसून येत आहे. मराठी साहित्याने उंच उडी घेत शेक्सपीअरची अजरामर साहित्य रचना ‘हॅम्लेट’ चा प्रयोग प्रथमच मराठीतून रंगभूमीवर आणला जात आहे. यातून मराठी साहित्य क्षेत्रात चर्चा रंगविली जात आहे. शासनाद्वारे हेल्मेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सक्ती करण्यावर जनसामान्यांत चर्चा घडू लागल्या. हेल्मेट आणि हॅम्लेट यात शब्द साधर्म्य असले तरी अर्थ वेगवेगळे आहेत. हॅम्लेट हे जगभरात गाजलेली इंग्रजी साहित्यकृती आहे तर हेल्मेट ही काळाची गरज झाली आहे. सुरक्षित प्रवासाचे साधन झाले आहे. त्याची सक्ती असावी की नसावी, हा वादाचा विषय होऊ लागला आहे.वाहतूक पोलिसांना मिळाले आयते कोलितग्रामीण भागात तथा लहान शहरांमध्ये हेल्मेटची सक्ती झाल्यास आणि याचे पालन मोठ्या प्रमाणात न झाल्यास दंड आकारण्याचा घटनेत मोठी वाढ होणार आहे. यामुळे नागरिकांवर एक नव्या दंडाची आकारणी, वसुलीचे ओझे वाढण्याची अधिक शक्यता आहे. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यात वाढ होऊन त्यांना चिरीमिरीचे आयते कोलित मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दंडाच्या रकमेची शासकीय तिजोरीत भर टाकण्यापेक्षा चिरीमिरीला अधिक स्थान प्राप्त करून देण्याच्या शक्यतेत वाढ होणार आहे. हा संभाव्य धोकाही लक्षात घेण्यासारखा आहे. या सर्व बाबींचा विचार करण्यासारखा असून लहान शहरांतील नागरिकांच्या त्रासात वाढ होणार आहे. यामुळे जनभावनेचा विचार करून वैचारिक गांभीर्याने हेल्मेट सक्तीकडे पाहणेच गरजेचे आहे.अपघात प्रसंगी होते हेल्मेटने सुरक्षाअपघात झाल्यास डोक्याला इजा होऊ नये म्हणून संरक्षणाची ही व्यवस्था अत्यंत गरजेची आहे. ती यंत्रणा सरसकट पद्धतीने राबविण्याची घाई करू नये. मोठ्या शहरांच्या याबाबतच्या समस्या आणि लहान शहरातील समस्या एकसारख्या नसून वेगवेगळ्या आहे, हे ध्यान्यात घेत निर्णय घेणे अपेक्षित आहे. लहान शहरे, ग्रामीण भागातील गावे, तेथील अंतर्गत वाहतूक अर्थात गावातच चालणाºया वाहतुकीसाठी हेल्मेट हे लोढणंच ठरत असल्याने विरोध होणे स्वाभाविक आहे. अशा ठिकाणी हे नियम शिथिल ठेवणे गरजेचे आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. अकारण जनतेला त्रास होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने गांभीर्य लक्षात घेत हेल्मेटची सक्ती लादू नये, अशी मागणी नरेंद्र मुळे, सुनील सातघरे, संजय डांगरे, लक्ष्मण बोई, अशोक शर्मा, राऊत आदींनी केली आहे.