लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्या शेकडो गरीब कुटुंबाची आबाळ होत आहे. अशा कुटुंबांना रोजगारासाठी बाहेर पडलं ही कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन आपुलकी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत फाळके पाटील यांनी अशा कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निश्चय जाहीर केला होता. यासाठी त्यांनी सिंगापूरस्थित एका मित्राकडून आलेले आलेली रक्कम गरीबांपर्यंत पोहोचविण्याचे काम हाती घेतले. जगभरात आपुलकी संस्थेच्या प्रामाणिक कामासोबत जुळलेले असंख्य लोक पसरलेले आहेत त्यांनी एका शब्दावर आर्थिक मदत देण्याचं निश्चित केलं. नंतर अभिजित फाळके यांच्या पुढाकाराने समाजातील ज्या लोकांची पोटं रोजंदारीवर आहेत आणि ज्यांना या दिवसात बाहेर कामावर निघणे कठीण आहे अशा गरजूंना १००० रु आर्थिक मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले.या उपक्रमातर्गत सावंगी मेघे येथील तीन लोकांना प्रत्येकी १००० रु चे वाटप करण्यात आले आहे. हे तिन्ही लोक रोजंदारी व रोज कमावून आपला चारिथार्थ चालवायचे, अशी माहिती आपुलकी संस्थेचे जुळलेले सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक प्रवीण पेठे यांनी लोकमत'शी बोलताना दिली.आम्ही सर्वांचे आपुलकी सामाजिक संस्थेमार्फत या दात्याचे आणि उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, असेही पेठे यांनी म्हटले आहे.
Corona Virus in Wardha; वर्धावासियांसाठी सिंगापूरहून आला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:13 PM
जगभरात आपुलकी संस्थेच्या प्रामाणिक कामासोबत जुळलेले असंख्य लोक पसरलेले आहेत त्यांनी एका शब्दावर आर्थिक मदत देण्याचं निश्चित केलं. नंतर अभिजित फाळके यांच्या पुढाकाराने ज्या लोकांची पोटं रोजंदारीवर आहेत अशा गरजूंना १००० रु आर्थिक मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले.
ठळक मुद्देसावंगी येथील नागरिकांना रोख रक्कम दिलीआपुलकी संस्थेच्या पुढाकारातून उपक्रम