लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली पण सध्या गुजरात येथील सुरत येथे वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे जयपूर-चन्नई एक्स्प्रेसमधून अपहरण करण्यात आले. अपहरण करण्यात आलेल्या नवविवाहितेच्या भ्रमणध्वनीचे शेवटचे लोकेशन वर्धा नजीक आढळून आल्याने तेलंगणा राज्यातील मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांची चमू वर्धेत दाखल झाली आहे. सदर चमूसह वर्धा लोहमार्ग पोलीस सध्या त्या नवविवाहितेच्या शोध घेण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवित आहेत.लोहमार्ग पोलीस सूत्रानुसार, षण्मुगम द्रविड यांच्या १९ वर्षीय मुलीचे मध्यप्रदेशातील रतलाम येथे रेल्वे विभागात गँगमन म्हणून कार्यरत असलेल्या एल. चिन्ना मनी याच्याशी १७ जूनला विवाह झाला. विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवविवाहित पती-पत्नीसह एल. चिन्ना मनी यांची बहिण व वडील हे जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसने नियोजित ठिकाणी जाण्यासाठी २४ जून रोजी निघाले होते. परंतु, सदर धावत्या रेल्वेगाडीत नवविवाहिता दिसून येत नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. परंतु, ती कुठेच आढळून न आल्याने तेलंगणा राज्यातील मंचेरीयाल लोहमार्ग पोलीस ठाण्यात नवविवाहिता हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान २५ जून रोजी नवविवाहितेने तिच्या वडिलांशी मोबाईलवर संपर्क साधून आपले कुणीतरी अपहरण केले आहे. या अपहरणकर्त्यांनी माझ्याजवळील दागिने हिसकावून घेतले असून साधे कपडेही जवळ ठेवले नसल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच नवविवाहितेच्या कुटुंबियांनी सदर प्रकाराची माहिती मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांना दिली. मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांनीही आपल्या तपासाला गती देत नवविवाहितेच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनची पडताळणी केली. नवविवाहितेने तिच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर तिच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट दाखविण्यात आल्याने मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ वर्धा गाठले. सदर चमुतील सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र रेड्डी, पोलीस शिपाई डी. श्रीनिवास, के. राजू यांनी वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात येत संपूर्ण प्रकाराची माहिती देत त्यांना सहकार्य मागितले. त्यावर वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण वांगे यांनी वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे राहूल यावले, अशोक हनवते, नितीन शेंडे, विजय मुंजेवार यांना सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. वर्धा व मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी विशेष शोधमोहीम राबविली. वृत्तलिहिस्तोवर नवविवाहितेचा शोध लागला नव्हता.मोबाईल बंदचनवविवाहितेने तिच्या वडिलांना आपले अपहरण करण्यात आल्याची माहिती तिच्याच भ्रमणध्वनीवरून दिल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. परंतु, त्यानंतर सदर नवविवाहितेचा मोबाईल बंदच येत असल्याने वर्धा व मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांना तिचा शोध घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदर नवविवाहिता हरविल्याप्रकरणी तेलंगण राज्यातील मंचेरीयाल लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. आज त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चमू आमच्याकडे येत त्यांनी आम्हाला सहकार्य मागितले. आम्ही त्यांना नवविवाहितेच्या शोधासाठी सहकार्य करीत आहोत.- प्रविण वांगे, ठाणेदार, लोहमार्ग पोलीस स्टेशन, वर्धा.
जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून नवविवाहितेचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:52 PM
मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली पण सध्या गुजरात येथील सुरत येथे वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे जयपूर-चन्नई एक्स्प्रेसमधून अपहरण करण्यात आले. अपहरण करण्यात आलेल्या नवविवाहितेच्या भ्रमणध्वनीचे शेवटचे लोकेशन वर्धा नजीक आढळून आल्याने तेलंगणा राज्यातील मंचेरीयाल लोहमार्ग पोलिसांची चमू वर्धेत दाखल झाली आहे.
ठळक मुद्देशोधमोहीम सुरूतेलंगणाचे लोहमार्ग पोलीस वर्धेत दाखल