लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनूस्मृतीचे दहन केले आणि संविधानाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करून स्त्रियांच्या जीवनात प्रकाशपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडल; परंतु ते पास होऊ शकले नाही. हिंदू कोड बील तेव्हाच पास झाल असते तर स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष संपला असता, कारण हे हिंदू कोड बिल म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचे, सन्मानाचे, मुक्तीगीत होय, असे गौरवोद्गार निवेदिका, गायिका ज्योती भगत यांनी काढले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनेकांत स्वाध्याय मंदिर व इतर समविचारी संघटनांच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अभ्यास वर्गात त्या बोलत होत्या. यावेळी अरुण चवडे, बाबाराव किटे, डॉ. माधुरी झाडे, राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, सुनील ढाले उपस्थित होते. प्रारंभी संजय भगत यांनी गीत सादर केले. प्रास्ताविक प्रितेश म्हैसकर तर संचालन विजय पचारे यांनी केले. परिचय गजानन कोरडे तर आभार जगदीश डोळसकर यांनी मानले.
हिंदू कोड बिल स्त्री स्वातंत्र्याचे मुक्तीगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 6:00 AM
स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडल; परंतु ते पास होऊ शकले नाही. हिंदू कोड बील तेव्हाच पास झाल असते तर स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष संपला असता, कारण हे हिंदू कोड बिल म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचे, सन्मानाचे, मुक्तीगीत होय, असे गौरवोद्गार निवेदिका, गायिका ज्योती भगत यांनी काढले.
ठळक मुद्देज्योती भगत : महाराष्ट्र अंनिसच्या अभ्यासवर्गात गौरवोद्गार