वर्धा - आज सकाळी प्राणज्योत मालवलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणातील प्राध्यापिकेवर संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या गावातील ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी तिला अत्यंत दु:खद अंतकरणाने निरोप दिला. हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला होता.
दरम्यान,या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. तसेच पिडीतेच्या भावाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येईल,असे वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी लेखी लिहून दिले आहे.
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला.
हिंगणघाट जळित प्रकरण; रुग्णवाहिका अडवून नागरिकांनी पोलिसांवर केली दगडफेक
'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप
हिंगणघाट जळीत प्रकरण: नकार पचविणे अवघड गेल्याने नराधमाने केले अमानुष कृत्यगेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. ७ फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला होता.