लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कचरा संकलीत केल्यावर विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेकडून हा कचरा बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीत टाकण्यात येतो. अनेकदा कचरा रस्त्यालगत टाकला जात असल्याने हिंगणघाट वर्धा या राज्य मार्गाला गार्बेज झोनचे स्वरूप प्रात झाले आहे. या कचºयामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो.अनेकदा रस्त्यालगत टाकलेला कचरा हवेमुळे उडत जाऊन लगतच्या शेतात जमा होतो. अनेकदा शेतातील पिकांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. बोरगाव (मेघे) गावाच्या हद्दीत नगर परिषदेकडून टाकण्यात आलेल्या कचºयाची अनेकदा योग्य विल्हेवाट लावली जात नाही. उघड्यावर टाकण्यात आलेल्या कचºयात सुका आणि ओला कचरा एकत्रीत असतो. अशात हा कचरा पेटविल्यास त्यातुन केवळ धुर निघतो. यामुळे रहिवाशांना धुराचाही त्रास सहन करावा लागतो.अनेकदा कचºयासह मृत पावलेले जनावर फेकण्यात येते. ही बाब आरोग्याला धोकादायक ठरणारी आहे. वाºयाच्या झोतामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंध पसरते. इतकेच नव्हे तर बसने प्रवास करीत असताना प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. वर्धा नगर परिषद तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे याची येथील रहिवाशांनी तक्रार केली आहे. मात्र कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे दिसते. एकीकडे शहर स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात बोरगाव (मेघे) दुर्गंधीयुक्त करण्याचा हा प्रकार असल्याचे येथील रहिवासी म्हणतात. नगर परिषदेने येथे कचरा टाकल्यावर त्यावर वेळीच प्रक्रिया करण्याची गरज आहे. मात्र याची कुणी दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नाहक मनस्ताप होतो. कचºयावर प्रक्रिया करणारी सुविधा येथे निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.आरोग्याचा प्रश्न गंभीरबोरगाव (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीत वर्धा नगर परिषदेकडून जमा झालेला कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. हा कचरा काही सुका तर काही ओला असतो. या कचºयासोबतच मृत पावलेले श्वान, डुक्कर टाकण्यात येते. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. तसेच वारा आल्यास दुर्गंधी वस्त्यांमध्ये पसरते. टाकलेल्या कचºयाला वारा लागताच हा कचरा परिसरात असलेल्या शेतकºयांच्या शेतात जातो. यामुळे शेतकºयांची उभे पीक खराब होत आहे. शहर स्वच्छ करून शहरातील कचरा बोरगावात आणून टाकला जात आहे. यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर अनेक गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याचीही दयनीय अवस्थाबोरगाव (मेघे) ग्रामपंचायतपासून ते मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील महाविद्यालयासमोर मोठा खड्डा पडला आहे. शिवाय पुलाजवळ देखील मोठा खड्डा असल्याने ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.बांधकाम विभागाकडे याची तक्रार देण्यात आली तरी कोणतीच डागडुजी करण्यात आली नाही. नुकत्याच झालेल्या अपघातात युवकाला गंभीर झाली आहे. यानंतर बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याची गरज भासत नाही काय असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करतात.महाविद्यालयासमोर असलेला खड्डा दिवसेंदिवस मोठा होत आहे. असल्यामुळे नुकत्याच एका मुलाचा अपघात झाला. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले असताना खड्डा बुजविण्यास टाळाटाळ करीत उलट सल्ला देण्याचा प्रकार सुरू केला आहे.
हिंगणघाट रस्ता झाला गार्बेेज झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:50 AM
शहरातील कचरा संकलीत केल्यावर विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेकडून हा कचरा बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीत टाकण्यात येतो.
ठळक मुद्देदुर्गंधीमुळे नागरिक व प्रवासी बेजार : कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने समस्या बिकट