जिल्ह्याचा निकाल ८५.९५ टक्के : १९ हजार ५१५ पैकी १६ हजार ७७३ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : शैक्षणिक जीवनात पहिली परीक्षा म्हणून महत्त्व असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ८५.९५ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. निकाल आॅनलाईन असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेसह इंटरनेट केंद्रांवर गर्दी केली होती. जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान यंदा हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूलच्या गौरव अरुण काचोळे याने पटकाविला आहे. त्याने ९७.८० टक्के (४८९) गुण घेतले. तर द्वितीय क्रमांक वर्धेच्या अग्रगामी हायस्कूलच्या अपूर्व प्रवीण उपदेव याने मिळविला. त्याला ९७.६० टक्के (४८८) गुण आहे. जिल्ह्यात मुलींमधून प्रथम येण्याचा मान अग्रगामी हायस्कूलच्या वृषाली विजय मसने हिने पटकाविला आहे. तिला ९८.४० टक्के (४८७) गुण मिळाले आहे. तर याच शाळेची साक्षी राजेंद्र कुळकर्णी हिने ९७.२० टक्के ($४८६)गुण घेत चवथा क्रमांक मिळविला. आठही तालुक्यातील २६८ शाळांतून १९ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार ९०९ मुले तर ९ हजार ६०६ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १६ हजार ७७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८ हजार २०३ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८३.७८ टक्के आहे. तर ८ हजार ५७० मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी ८९.२२ टक्के आहे. यंदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील २१ शाळांनी १०० टक्के निकाल दिला. जिल्ह्यातील शाळेचा विचार केल्यास १९ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला नाही. उर्वरीत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचा निकाल जाहीर झाला. सर्वाधिक निकाल वर्धा तालुका ८९.२० टक्के तर सर्वात कमी निकाल आष्टी (शहीद) तालुक्याचा ८०.६१ टक्के लागला आहे. हिंगणघाट तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.६९ इतकी आहे. आर्वी तालुक्याचा निकाल ८३.४२ टक्के लागला. देवळी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.२३ इतकी आहे. कारंजा तालुक्याचा निकाल ८४.७१ टक्के लागला. समुद्रपूर तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.५४ असून सेलू तालुक्याचा निकाल ८०.८४ टक्के लागला आहे.(प्रतिनिधी)पहिल्या चारमध्ये केवळ एका गुणाचा फरक ४दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात गौरव काचोळे याने ४८९ गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. दुसरा क्रमांक अपूर्व उपदेव याने ४८८ गुण घेत पटकाविला. जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यात केवळ एका गुणाचा फरक आहे. हाच एका गुणाचा फरक तिसऱ्या व चवथ्या क्रमांकाकरिताही कायम राहिला. जिल्ह्यात तृतीय क्रमांकासह मुलींमधून पहिली आलेल्या वृषाली मसने हिने ४८७ गुण घेतले. तर चवथ्या क्रमांकावर असलेल्या साक्षी कुळकर्णी हिला यापेक्षा एक गुण कमी म्हणजेच ४८६ गुण मिळाले. यामुळे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत एका गुणाचा फरक महत्त्वाचा ठरला.
हिंगणघाटचा गौरव अव्वल
By admin | Published: June 09, 2015 2:30 AM