श्याम चिचाटे ।आॅनलाईन लोकमतनाचणगाव : सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.श्री सिद्धेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सदर मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येणार असून महाशिवरात्रीनिमित्ताने येथे शिवभक्तांचा मळाच फुलणार आहे. हे मंदिर भोसले कालीन असल्याचे सांगण्यात येते. नागपूर येथून भोसल्यांचे येणे-जाणे वर्धा मार्गाने नाचणगावात असायचे. संपूर्ण सैन्यासह त्यावेळी येथे त्यांचा मुक्काम असायचा. त्याची साक्ष येथील पुरातन वास्तू व अवशेष देतात. श्री सिद्धेश्वराच्या नावाने ओळखल्या जाणाºया मंदिराची ख्याती मोठी आहे. पुलगाव शहरात वर्धा नदीवर पुरातन शिवमंदिर असले तरी अनेक भाविक दर्शनाकरिता सिद्धेश्वर मंदिरात आल्याशिवाय राहत नाहीत. येथील आख्यायिका भाविकांना पिंडीच्या दर्शनासाठी खेचून आणते.महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता श्री सिद्धेश्वराची पालखी आणि रथ मिरवणूक तथा महाप्रसादाने १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पालखी व रथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांचा जनसमूदाय येथे हजेरी लावणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेकरिता विविध मंडळातील सदस्य मदत करीत असून अनेक भाविकही सहकार्य करीत आहे.पाण्याच्या खोलीचा शोध अयशस्वीशिवलिंगाच्या चारही बाजूने असणाऱ्या पाण्याच्या खोलीचा शोध घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला; पण तो एकदाही यशस्वी झाला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. हे पाणी बाराही महिने असते. गावात संकट आले तरच पाणी कमी होते, असेही भाविक सांगतात. गावातील नदी, नाले कोरडे पडले तरी शिवलिंगातील पाणी आटत नाही, हे नवलच म्हणावे लागेल.
नाचणगावचे ऐतिहासिक शिवमंदिर श्रद्धास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:12 AM
सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.
ठळक मुद्देदर्शनासाठी असते गर्दी : बाहेर जिल्ह्यातील भाविकही टेकवितात माथा