लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय संस्कृतीचे दर्शन, राष्ट्रावर झालेले आक्रमण, भारतीय स्वातंत्र्याची लढाई आणि गांधी जीवन व गांधी विचारांची योग्य सांगड आणि प्रभावी चित्रांकन असलेल्या तीर्थधारा या बॅले कलाकृतीचे शनिवारी, १६ फेब्रुवारीला योगेंद्र कावळे स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतितरंगद्वारे अग्निहोत्री कॉलेजच्या रंगमंचावर सादरीकरण होणार असल्याची माहिती शंकरप्रसाद अग्निहोत्री गुरुवारी महाविद्यालयाच्या पेंटॉगॉन सभागृहात पत्रपरिषदेत दिली.यावेळी श्याम सरोदे, मनीष खडतकर, विजय दुरुगकर, शशिकांत बागडदे, महाविद्यालयातील विविध शाखांचे प्राचार्य उपस्थित होते.अग्निहोत्री म्हणाले, वर्ध्याच्या बिरादरी कलावृंदांनी साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीत स्थानिक ४० कलाकारांचा सहभाग आहे. यापूर्वीही या कलाकृतीचे वर्ध्यात सादरीकरण झाले असून पाचव्यांदा सादर होणार आहे. राष्टÑपिता महात्मा गांधींच्या जीवनकार्याचा आलेख संगीत आणि नृत्याविष्काराच्या माध्यमातून तीर्थधारा सादर होणार आहे.तीर्थधारामध्ये पहिल्या भागात रामायण, महाभारत काळाशी सुसंगत सुरुवात सहजतेने इतिहासाचे दर्शन घडविते. भारतीय संस्कृतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक बदल, विविध प्रांतांची साम्राज्यशाही, तत्कालीन रूढी, परंपरा, संतांचे कार्य शिवशाहीचा उदय, स्वराज्याची स्थापना, इंग्रजांचे आगमन, प्रथम तराजू, साम्राज्यासाठी कूटनीती, झाशीच्या राणीचा रणसंग्राम, १८५७ चे युद्ध, इंग्रजांचे अधिपत्य अशा एक नव्हे तर अनेक ऐतिहासिक घटना संगीत व नृत्य आणि प्रकाश योजना प्रेक्षकांना भुरळ घालणारी ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले. जय महाकाली शिक्षण संस्था, गांधी सिटी पब्लिक स्कूल आणि कावळे परिवार, बिरादरी कलावृंदांच्या वतीने संयुक्तरीत्या ही कलाकृती शनिवारी सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे. अध्यक्षस्थानी शंकरप्रसाद अग्निहोत्री असतील.खासदार रामदास तडस, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. संगीतमय तीर्थधारा कलाकृती पाहण्यासाठी वर्धेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी आयोजकांच्या वतीने केले.
‘तीर्थधारा’तून उलगडेल स्वातंत्र्याचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:10 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारतीय संस्कृतीचे दर्शन, राष्ट्रावर झालेले आक्रमण, भारतीय स्वातंत्र्याची लढाई आणि गांधी जीवन व गांधी ...
ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : शनिवारी वर्ध्यात सादर होणार कलाकृती