मार्चच्या प्रारंभीच पारा ४०.५ अंशावर : मे महिन्यातील झळांची जिल्हावासीयांना आतापासूनच धास्तीरूपेश खैरी वर्धाउन्हाळ्याला प्रारंभ होताच उन्हाच्या झळा चांगल्यास जाणवू लागल्या आहेत. यात दर तीन वर्षांनी येणारी ‘हिट वेव्ह’ यंदाच्या वर्षी असल्याने नागरिकांना त्याचा चांगलाच तडाखा बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचाच प्रकार म्हणून मार्च महिन्याच्या प्रारंभी यंदा पारा ४०.५ अंशावर पोहोचला आहे. गत तीन वर्षांपूर्वी याच तारखेला जिल्ह्यात ४०.७ अंशावर असल्याची नोंद झाली होती. यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासूनच उन्हाचा दाह जाणवायला लागला. साधारणत: एप्रिल महिन्यात पारा चाळीसपर्यंत पोहोचतो. यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाऱ्याने ४०.५ अंश गाठला आहे. तर किमान तापमान २३.२ एवढे नोंदविल्या गेले आहे. परिणामी मार्च महिन्याच्या शेवटालाच तापमान ४५ अंशावर जाते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. आताच ४० अंशावर पोहोचलेल्या पाऱ्यामुळे जिल्हावासीयांनी एप्रिल व कडक उन्हाच्या मे महिन्याच्या उन्हाची आतापासूनच धास्ती घेतली आहे. या उन्हापासून बचावाकरिता आरोग्य विभागाच्यावतीने काही सूचना करण्यात आल्या आहेत. यात उन्हापासून बचावाकरिता दुपट्टा बांधावा. तो सूती असावा. अधिकाधिक पाणी प्यावे, उन्हाच्या तडाख्यापासून बचावाकरिता शितपेय म्हणून कुठल्याही कोल्ड ड्रींकचा वापर न करता नैसर्गिग पेयाचा वापर करावा, असे सांगण्यात येत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना बसणार ‘हिट वेव्ह’चा तडाखा
By admin | Published: March 13, 2016 2:22 AM