लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांचे पैसे अडकले आहेत. ही रक्कम सुमारे ७ हजार कोटींच्या घरात आहे. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणुकदारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लढा वेल्फेअर फाऊंडेशनने केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.मार्केटींग पर्सन म्हणून ग्राहकांकडून १९५६ च्या कायद्यानुसार व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मेंबरशिप मार्केटमधून गोळा करण्यात आली. सदर कंपनीमध्ये ५ लाखांपेक्षा अधिक मार्केटींग पर्सन फुलटाईम व्यवसाय करीत होते. कंपनीकडे १९९७ पासून मार्केटींग पर्सनच्या माध्यमातून अरबो रुपये जमा करून कंपनीने आपला विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवर केला आहे. सद्यस्थितीत या कंपनीकडे ५५ लाख ग्राहक असून त्यांच्या माध्यमातून ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा करण्यात आली आहे.३१ जुलै २०१४ पर्यंत पॅनकार्ड क्लब कंपनी सुरळीत सुरू होती. ग्राहकांचा परतावा नियमित दिला जात होता; पण ३१ जुलै २०१४ ला सेबीने कंपनीला अंतरीम आॅर्डर देऊन व्यवसाय बंद करण्यास सांगितले. ३१ जुलै २०१४ ते मे २०१७ पर्यंत कंपनी व सेबीमध्ये न्यायालयीन वाद सुरू होता. १२ मे २०१७ रोजी अंतिम निकाल सेबीच्या बाजूने लागलेला आहे. यावेळी ग्राहकांचे सर्व परतावे परत करण्यास ३ महिन्यांचा कालावधी कंपनीला देण्यात आला होता. पॅनकार्ड क्लबने शासनाला टॅक्स, मार्र्केटींग पर्सनचा टीडीएस तसेच सर्व प्रकारचा कर भरलेला आहे. बऱ्याच वर्षांनंतर शासनाला ही कंपनी फ्रॉड आहे, हे कसे कळले. सेबीने लवकरात लवकर कंपनीची सर्व मालमत्ता विक्रीस काढावी. शिवाय विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या लिलावातील राखीव किंमतीनुसारच मालमत्तेची विक्री करावी. त्यापेक्षा कमी किमतीमध्ये विक्री करू नये. मालमत्ता विक्रीतून जसजशी रक्कम सेबीकडे जमा होईल, त्यानुसार ग्राहकांचे दावे निकाली काढावेत. लिलाव प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी संघटनेचे पाच पदाधिकारी लिलाव प्रक्रिया समितीमध्ये सेबीने सहभागी करून घ्यावेत. ग्राहकांचे दावे निकाली काढण्याचा कालावधी सेबीने जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व लढा वेल्फेअर फाऊंडेशनचे महाराष्ट्र संघटक प्रमोद यादव यांनी केले. आंदोलनात दिनेश भुते, गणेश बावणे, भाऊ शंभरकर, गजानन हांडे, गणेश भोगे, वामन मते, गणपत जोगे, गजेंद्र ढोक, मनोहर मसकर, संदीप रघाटाटे, भीमराव मुटे, ज्ञानेश्वर ढोक, सोनिया यादव यांच्यासह मोठ्या संख्येने गुंतवणुकदार सहभागी झाले होते.
पॅनकार्ड क्लब गुंतवणुकदारांचे जिल्हा कचेरीसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:44 PM
पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक करणाºया अनेकांचे पैसे अडकले आहेत. ही रक्कम सुमारे ७ हजार कोटींच्या घरात आहे. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणुकदारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लढा वेल्फेअर फाऊंडेशनने केली आहे.
ठळक मुद्दे७ हजार कोटींचा गंडा : लढा वेल्फेअर फाऊंडेशन करणार उपोषण