लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाचा अकरावा दिवस असून मागण्यांवर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे कृती समितीने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात गुरुवारी दुपारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शासनविरोधी निदर्शने करून अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या नव्या आदेशाची होळी केली.शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रातील ६ वर्षांची बालके, गरोदर व स्त्नदा माता आणि किशोरी मुलींच्या किमान सेवा खंडित होवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था म्हणून आरोग्य विभागातील आशा आरोग्य सेविका यांना अंगणवाडीत आहार वाटपाचे काम सोपविण्यात यावे अशा आदेश महिला व बाल विकास आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला.अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला हा छेद देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांचा आहे. हा प्रकार अंगणवाडी सेविका व आशांमध्ये भांडण लावण्याचा आहे असे म्हणत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने निदर्शने करून संपात फुट पाडण्यासाठी काढण्यात आलेल्या शासन आदेशाची होळी आयटकच्या विजया पावडे, वंदना कोळणकर, मंगला इंगोले, माला भगत, ज्ञानेश्वरी डंबारे, शबाना खान यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अंगणवाडी सेविकांकडून शासकीय आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:58 AM
अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाचा अकरावा दिवस असून मागण्यांवर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे कृती समितीने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देसंपाचा अकरावा दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने