शेतकरी संघटनेचे आंदोलन : नवतंत्रज्ञानाचा विरोध केल्याबद्दल नाराजीवर्धा : शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ देत त्यांची प्रगती साधण्याचे धोरण शासनाने राबविणे गरजेचे असते; पण सध्या विपरित घडत आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. खुद्द कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनीच ही भूमिका घेतल्याने शेतकरी संघटनेने त्यांच्या प्रतिकात्मक चित्राची मंगळवारी होळी केली.स्थानिक गांधीनगर येथील शिवमंदिर सभागृहात शेतकरी संघटनेच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुणंवत हंगरगेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, महिला आघाडी अध्यक्ष शैलजा देशपांडे, कार्याध्यक्ष गोविंद जोशी, प्रवक्ता मानवेंद्र काचोळे, अधिवेशन सचिव अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्ष सरोज काशिकर, शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य ललिता बहाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या राऊत, सतीश दाणी, धोंडबाजी दाणी, दत्ता राऊत, शांताराम भालेराव, खुशाल हिवरकर, पांडुरंग भालशंकर, हेमंत वकारे, वसंत तुपकर, अरविंद लाडेकर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी कृषी मंत्री फुंडकर यांच्या प्रतिकात्मक चित्राची होळी करण्यात आली. याप्रसंगी फुंडकर यांनी भाषणात तंत्रज्ञानाला केलेल्या विरोधाचा निषेध नोंदविण्यात आला. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली. बायोटेक्नॉलॉजी, संशोधनास विरोध केल्यास शेतीसाठी असलेल्या संशोधन संस्था, विद्यापीठांचे काय, असा प्रश्नही यावेळी हंगरगेकर यांनी उपस्थित केला.(कार्यालय प्रतिनिधी)
कृषिमंत्र्याच्या प्रतिकात्मक चित्राची होळी
By admin | Published: September 28, 2016 1:43 AM