अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवायोजना व रोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या तरूणांची माहिती घेऊन त्यांना थेट गृहमंत्रालय भारत सरकारच्या नावाने नियुक्ती पत्र पाठविणारी टोळी राज्यात सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक तरूणांना यासंदर्भात भारतीय खुफिया विभाग गृहमंत्रालय भारत सरकार, मुंबई (महाराष्ट्र) यांचे नावे थेट नियुक्त पत्र पाठविण्याचे काम करण्यात येत आहे. सदर पत्र हे बोगस असल्याचे गृहविभागाच्या स्थानिक अधिकाºयाकडे चौकशी केल्यावर सांगण्यात आले आहे.राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक तरूण शासकीय नोकरीसाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी करीत असतात. येथील नाव नोंदणीची माहिती घेऊन त्यांना थेट नियुक्तीपत्र रजिस्टर पोस्टाने त्यांच्या घरी पाठविण्याचे काम काही टोळ्यांनी सुरू केले आहे. हे नियुक्ती पत्र पाठविताना त्यावर राजमुद्रांचा वापर करण्यात येत आहे. २६ जून २०१७ ची तारीख टाकून मिनिस्टर आॅफ होम अफेअर्स केंद्र सरकार खुफिया विभाग मुंबईच्या नावाने ज्युनिअर खुफिया अधिकारी, चालक/चपराशी या पदासाठीचे बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यात आले आहे. याच्यावर भारतीय राजमुद्रा व तिरंगा झेंड्याचा वापर करण्यात आला आहे. या नियुक्ती पत्रावर सुरक्षा ठेव म्हणून उमेदवारांनी १५ हजार ५०० रूपये भरावेत. ते परतावाच्या अटीवर राहतील तसेच तीन महिन्याचे प्रशिक्षण राहील व ही सरकारी नोकरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय यासंदर्भात अतिशय गोपनियता बाळगण्याबाबतही सूचना करणारे जवळ-जवळ चार पानाचे स्वतंत्र पत्रही या नियुक्तीपत्रासोबत जोडण्यात आले आहे. सेलू तालुक्याच्या घोराड येथील एका तरूणाला हे पत्र आॅगस्ट प्राप्त झाले. या तरूणाने सरकारी नोकरीसाठी कधी अर्ज केला नव्हता. त्याला अचानक हे नियुक्ती पत्र प्राप्त झाल्याने त्याने हे पत्र लोकमतकडे आणले. लोकमतने या संदर्भात मुंबई येथे काही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडे चौकशी केली असता त्यांनी हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले. अशाप्रकारे कुठलीही आदेशपत्र दिले जात नाही. तसेच सुरक्षा ठेव रक्कमही मागितली जात नाही, अशी माहिती लोकमतशी बोलताना एका अधिकाºयांनी दिली. राज्यभरात असे सरकारी नोकरीचे नियुक्तपत्र पाठवून तरूणांना ठगविण्याचे काम करणारी टोळी सक्रीय असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. या नियुक्ती पत्रावर एका अधिकाºयाची सही असून ते आयपीएस असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.आपल्याला घरच्या पत्त्यावर रजिस्ट्रीने नियुक्त पत्र मिळाले व थेट केंद्रीय गुप्तचर विभाग गृहमंत्रालय भारत सरकार येथे ड्रायव्हर, चपराशी पदावर नोकरी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. आपण कधीही अर्ज केलेला नाही. अचानक पत्र आल्याने आपल्या संशय आला.- देविदास गोपालसुशिक्षित बेरोजगार, घोराड
गृहमंत्रालयाच्या खुफिया विभागाचे थेट नोकरी आदेशपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 3:05 PM
सेवायोजना व रोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या तरूणांची माहिती घेऊन त्यांना थेट गृहमंत्रालय भारत सरकारच्या नावाने नियुक्ती पत्र पाठविणारी टोळी राज्यात सक्रीय असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देसरकारी राजमुद्रांचा वापर बेरोजगारांना फसविणारी टोळी राज्यभर सक्रीय