लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा नववा दीक्षांत सभारंभ गुरूवारी पार पडला. यात मध्य भारतातील ९० वर्षीय ख्यातनाम आरोग्य तज्ज्ञ डॉ. बी.जे. सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.यावेळी मंचावर राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलपती दत्ता मेघे, कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी उपस्थित होते. समारंभात विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा प्राप्त केली.यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून ते एक मिशन आहे. सर्वसामान्य माणसे ईश्वरानंतर सर्वाधिक विश्वास डॉक्टरवर ठेवतात. तुम्ही समाजातील देवदूत आहात. समाजातील शेवटचा माणूस तुमच्या केंद्रस्थानी असला पाहिजे.आज माहिती, ज्ञानाचे अनेक स्त्रोत उपलब्ध आहे. मदतीला नवी उपकरणे आहे. त्याचा लाभ घेत युवा पिढीने नवसंशोधनावर भर द्यावा. बौद्धिक विकासासह शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष दिले पाहिजे, असे मत डी.एम.एस्सी. या मानद पदवीने सन्मानित ९० वर्षीय डॉ. बी.जे. सुभेदार यांनी व्यक्त केले.
९० वर्षीय सुभेदार यांना मानद पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:33 PM
सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा नववा दीक्षांत सभारंभ गुरूवारी पार पडला. यात मध्य भारतातील ९० वर्षीय ख्यातनाम आरोग्य तज्ज्ञ डॉ. बी.जे. सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्देदत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ