ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : नजीकच्या मौजा केळापूर येथील शेतकरी वाल्मीक विश्वेश्वर भोयर यांच्या शेताला अज्ञात इसमाने आग लावली. यात ४ लाखांच्या वर नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.वाल्मीक भोयर यांचे मौजा केळापूर येथे ओलिताची साडेतीन एकर शेती आहे. त्यांनी दोन वर्षापूर्वी एक एकरमध्ये डाळींबाची लागवड केली होती. पीक चांगले बहरले होते; पण मंगळवारी दुपारी अज्ञात इसमाने आग लावली. यामुळे बहरलेली डाळींबाची बाग जळून खाक झाली. शिवाय ६० हजार किंमतीचा ठिबक सिंचन संच, ३० हजार रुपये किंमतीचे पाईप, ३ प्लास्टिक ड्रम आणि २० हजार रुपयांचे रासायनिक खत असे एकूण ४ लाखांच्या वर किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे सदर शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनेची माहिती तलाठी कार्यालय व कृषी सहायकांना देण्यात आली. माहिती मिळताच तलाठी एल.डब्ल्यू. लोखंडे व कृषी सहायक साधना ढुमणे यांनी नांदी फाऊंडेशनचे फिल्ड को-आॅर्डीनेटर विकास भोयर, शेतकरी मोहन भोयर, विनोद घोडे व शेतमालक वाल्मीक भोयर यांच्या साक्षीने पंचनामा केला. संबंधित विभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे. या आगीमध्ये तुरीच्या कुटाराचा ढीग जळाल्याने शेतकऱ्यापुढे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
भीषण आगीत डांळिबाची बाग खाक, ४ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:40 PM
नजीकच्या मौजा केळापूर येथील शेतकरी वाल्मीक विश्वेश्वर भोयर यांच्या शेताला अज्ञात इसमाने आग लावली. यात ४ लाखांच्या वर नुकसान झाले.
ठळक मुद्देठिबक संच, प्लास्टिक पाईप, तीन ड्रम, खते आगीच्या भक्ष्यस्थानी