शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:15 PM

यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी : फवारणीही निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नियोजन गडबडल्यामुळे हिरव्याकंच दिसणाºया कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. शेतकºयांनी फवारणी करूनही अळी कमी झाली नाही. त्यामुळे ऐन हंगामात शेतकºयांसमोर संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने औषध पुरविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.आष्टी, अंतोरा, लहानआर्वी, साहूर, भारसवाडा, तळेगावसह गावागावातील शेतकरी कृषी विभागाकडे घिरट्या घालत आहेत. कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रकाचा दौरा कृषी अधिकाºयांनी अद्यापही केला नाही. कपाशीवर गुलाबी बोंडअळी जास्त प्रमाणात दिसत आहे. कपाशीचे पीक पात्या फुलावर व बोंडावर आहे. त्यामुळे या अळीने पकड निर्माण केली आहे.आष्टी तालुक्यात फार कमी पाऊस पडला आहे. नदी नाल्यांना पाणी नाही. तलावात अवघा ३८ टक्के पाणीसाठी आहे. सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.आष्टी तालुक्यात १ हजार हेक्टर वर कपाशी पिकांना अळीने घेरले आहे. कृषी विभागाने गावागावात कृषी मार्गदर्शन मेळावे घेवून शेतकºयांवरील संकट कर करण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक वर्धा, कृषीमंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदनावर अनिकेत भडके नरसापूर, स्वप्नील महल्ले यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळाला नाही.कर्जाच्या संकटात बोंडअळीची भरबोंडामध्ये अळी शिरली की पूर्ण बोंड खराब होते. पाहिजे तसा कापूस त्यामधून निघत नाही. कापसाचा दर्जाही घसरतो. शिवाय सरकी किडक बनतात. रूईला मागणी करताना किंमत मिळत नाही. सरकीच्या तेलाचे प्रमाण फार कमी होते. याशिवाय निर्माण तयार होणाºया बियाण्याची उगवण क्षमता कमी झाल्याने उत्पन्नात फटका बसते. शेतकºयांना याची चिंता लागल्यामुळे यावर्षी उत्पन्न कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी आधीच कर्जापायी चिंतातूर आहे. त्यात नवीन संकट उभे ठाकले आहे.ममदापूर, आष्टी, मलकापूर तलावाची अवस्था पाण्यावाचून बिकट झाली आहे. अप्पर वर्धा धरणाचे एकही दार उघडले नाही. एवढी भीषण समस्या आहे.उपविभागीय कृषी अधिकारी पद गत दोन महिन्यांपासून रिक्त आहे. वरिष्ठ अधिकाºयांचा तालुक्यावर वचक दिसत नाही.