लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान खासगी व शासकीय डॉक्टरांनी चक्क हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसर स्वच्छ केला. शिवाय गोळा झालेल्या कचऱ्याचे योग्य विल्हेवाट याप्रसंगी लावण्यात आली.जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय जनजागृती मंच व जनहित मंचच्यावतीने राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर, वैद्यकीय जनजागृतीमंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. नितीन निमोदीया, डॉ. राज वाघमारे, डॉ. आसमवार, डॉ. मकरंदे, डॉ. चव्हाण, भारती पुनसे यांच्यासह वैद्यकीय जनजागृती मंच, जनहित मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाºयांनी स्वच्छतेचा संदेश दिला.
डॉक्टरांनी केले शासकीय रुग्णालय स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:34 AM
स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान खासगी व शासकीय डॉक्टरांनी चक्क हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसर स्वच्छ केला.
ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंच आणि जनहित मंचचा उपक्रम