आॅनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून मंगला इंगोले यांची उपस्थिती होती.राज्यात दोन लाख कर्मचारी शून्य ते ६ वयोगटातील मुले, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना सेवा पुरवित आहेत. या योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शंभर रुपये मानधनापासून काम केले आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचऱ्यांची सेवा भरती नियम तयार केले. यावेळी सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे ठेवले होते; परंतु अचानक फडणवीस सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले. यामुळे राज्यातील ३२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल. वर्धा जिल्ह्यातील शेकडो महिलांना घरी जावे लागेल.ज्या अंगणवाडी केंद्रात पाच ते दहा लाभार्थी आहेत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पोषण आहारावर परिणाम होणार आहे.शासनाच्या चुकीच्या निर्णया विरोधात आयटक तिव्र लढा उभा करेल. शासनाने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घेण्यासाठी मंगळवारी (२० फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न व शासनाची भुमिका याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्तविकातून जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी सप्टेंबरच्या राज्यव्यापी संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितींच्या नेत्यांसोबत चर्चा करून सेवाजेष्ठतेनुसार मानधन वाढ, भाऊबिज दोन हजार, सेवानिवृत्त लाभ दोन लाख देण्यात येईल असे जाहीर केले. परंतु अद्यापपर्यत शासनआदेश काढले नाही.बैठकीत ज्ञानेश्वरी डंभारे, प्रज्ञा ढाले, अर्चना वंजारी, वंदना खोबरागडे, मैना उईके, मनिषा सुरकार, शकुंतला शंभरकर, सुलभा तिरभाने, सुनिता टिपले, अल्का भानसे, शारदा कांबळे यांनी विचार व्यक्त केले. बैठकचे संचालन रंजनी पाटील यांनी केले तर आभार ज्योत्स्ना बोरकुटे यांनी मानले.१२८१ केंद्रात २५१८ सेविकाजिल्ह्यात एकूण १२८१ अंगणवाडी केंद्र आहे. या केंद्रात २५१८ महिला सेविका आहे. यात वर्धा १ मध्ये १२०, वर्धा २ मध्ये १५०, देवळी १५५, आर्वी १४४, आष्टी १०१, कारंजा १४१, सेलू १५३, समुद्रपुर १५४, हिंगणघाट १६३ अंगणवाडी आहेत.बचत गटाकडून आहार पुरविण्यास नकारबचत गटा कडून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे पैसे १२ महिन्यापासून शासनाने दिले नाही. त्यामुळे बचत गट आहार पुरविण्यासाठी नकार देत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर आहार सुरू आहे. याची जबाबदारीही याच सेविकांवर आहे.
शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:27 PM
महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली.
ठळक मुद्देदिलीप उटाणे : बोरगावच्या आयटक कार्यालयातील बैठक