लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने ऑटोचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यासह इतरही व्यावसायिकांची प्रतिष्ठाने कुलूपबंद असल्याने अडचणी वाढत आहे.मिष्ठान्न विक्रेत्यांचे प्रचंड नुकसानसमुद्रपूर तालुक्यात अनेक मिष्ठान्न उत्पादक व विक्रेते असून त्यांनी आपल्या दुकानात किमान ६० ते ७० हजाराची रसमलाई, पेढा, बर्फी यासारखे अनेक पदार्थ तयार केले आहे. ऐनवेळी लॉकडाऊनचा आदेश आल्याने आपापली दुकाने बंद केल्यामुळे लाखो रूपयाची मिठाई व नमकीन पदार्थ खराब झाल्याने ते नष्ट करणे भाग पडत आहे. समुद्रपूर, गिरड, जाम, नंदोरी, कोरा अशा अनेक गावात राजस्थानी आणि स्थानिकांचे मिठाई, नमकीनचे दुकाने असून या २२ दिवसात सर्व पदार्थावर बुरशी चढली आहे. परिणामी त्यांना हे सर्व पदार्थ नष्ट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिंकाना सरासरी एक ते दीड लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तालुक्यातील या व्यावसायिकांचे नुकसान १ कोटीच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
माठ विक्रीही थांबली उन्हाळ्याच्या दिवसात गरिबांचा फ्रिज म्हणून माठाची आठवण येते. या दिवसात गरीब तसेच श्रीमंतांकडूनही मातीचे माठ, रांजन, सुरईला मोठी मागणी असते. कुंभार समाजाकडून या वस्तूंची निर्मिती व विक्री केली जाते. यावर्षी मात्र, लॉकडाऊनमुळे कुणालाही घराबाहेर पडण्यासाठी बंदी असल्याने या व्यवसायावरही गंडांतर आले आहे. पूर्वी १२ बलुतेदारपद्धती होती. त्यापैकी नाव्ही, वरठी, माळी, कुंभार, गवंडी या समाजाचा व्यवसाय बुडल्याने त्यांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहे. आता यातून बाहेर पडण्याकरिता त्यांना शासकीय सहाय्याची गरज आहे.
ऑटोचालकांवर कोसळली बेरोजगारीची कुºहाड स्थानिकांसह आजुबाजुच्या गावातील बेरोजगार युवकांनी ऑटोरिक्षाच्या माध्यमातून आपला रोजगार उभा केला आहे. मात्र गेल्या २१ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोची चाके थांबल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. आता ऑटो घरीच उभा असल्याने त्यांची रोजची आवक थांबल्याने कुटुंब चालविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या आपत्तीकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्याने त्यात ऑटो चालकांनाही मोठा फटका असला आहे.ऑटोच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी व प्रवाशांना दररोज सेवा पुरविली जायची. त्यामुळे दररोज ऑटो चालकांना इंधनाचा खर्च वगळता दानशे ते तिनशे रुपये मिळत होते. परंतु आता सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासकीय कार्यालयातही ५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये असे प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले. त्यामुळे सर्व वाहनेही बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे.गेल्या तीन आठवड्यापासून ऑटो बंद असल्याने याचा परिणाम ऑटोचालकांवर झाला असून त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्वी, आष्टी, वर्धमनेरी, सारवाडी, पारडी, एकांबा, चिस्तुर, बेलोरा,जळगांव, खडका, भिष्णुर, आनंदवाडी, भारसवाडा, टेकोडा या गावातील ऑटोरिक्षा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिकांच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. मात्र, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वांच्या नियमित मिळकतीवर संक्रात आली आहे. त्यामुळे आता ऑटोचालकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
लॉकडाऊनसोबतच चालकांची अडचणही वाढलीसमुद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप लक्षात घेता शासने प्रारंभी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. या कालावधीत समुद्रपूर तालुक्यातील सर्वच भागातील व्यवहार प्रभावित झाले आहे. सर्वाधिक फटका ऑटोचालकांना बसला आहे. आता १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उघडेल आणि ऑटोची थांबलेली चाके धावण्यासोबतच आपल्याही मिळकतीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आटोचालकांना होती. पण, लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने तालुक्यातील सर्व ऑटोचालकांच्या अडचणीही आणखीच भर पडले आहे.शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ऑटोरिक्षाच्या माध्यमातून रोजी रोटीचा प्रश्न सोडविण्याकरिता बँक, पतसंस्था व खासगी फॉयन्सच्या माध्यमातून ऑटो खरेदी केले. परंतु, लॉकडाऊनमुळे ऑटोच्या चाकांना ब्रेक लागल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. आता ऑटोच्या कजार्चा हप्ता कसा भरायचा, परिवाराचा उदनिर्वाह कसा चालवायचा आदी प्रश्नांनी त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण केला आहे.संचारबंदीत विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होत असल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. परिणामी ऑटोही रस्त्याने धावतांना दिसत नाही. आधी २१ दिवस आणि आता १९ दिवसापर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने समुद्रपूर, जाम, नंदोरी, कांढळी, गिरड, कोरा, लसणपूर, उब्दा, वासी, सावरखेडा, धुमखेडा, राळेगाव, वायगाव (गोंड), वडगाव, पाठर, किन्हाळा, परडा, वाघेडा, निंभा, कवठा आदी गावातील ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक फटका बसला आहे. या काळात आणि नंतरही ऑटोच्या कजार्चे हप्ते कसे फेडायचे याच विवंचनेत ऑटोचालक दिवस काढत आहे.
कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न झाला गंभीरदेवळी ते पुलगाव मार्गादरम्यान चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव, दहेगाव (स्टेशन.), दहेगाव (गावंडे), केळापूर, मलकापूर, कवठा (रेल्वे), कवठा (झोपडी) अशी दहा ते बारा गावे येतात. हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये आठ ते दहा ऑटो आहेत. एकट्या चिकणी गावातच १० ते १२ ऑटो असून या संचारबंदीच्या काळात सर्व ऑटोचालक अडचणीत आले आहे. लॉकडाऊन मोकळे करण्याऐवजी वाढविण्यात आल्याने आर्थिक संकटामुळे ते हतबल झालेले दिसून येत आहे. शासनाकडून मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे