शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

चक्रीवादळाचा तडाखा

By admin | Published: May 07, 2016 2:06 AM

तालुक्यातील काही गावांना चक्री वादळाचा गुरूवारी चांगलाच तडाखा बसला. यामध्ये पिंपळगाव (लुटे),

अवकाळी पावसाचा कहर : आर्वी, वर्धा, वायगाव येथे नुकसान देवळी : तालुक्यातील काही गावांना चक्री वादळाचा गुरूवारी चांगलाच तडाखा बसला. यामध्ये पिंपळगाव (लुटे), खर्डा, बोपापूर वाणी, रत्नापूर, हुस्रापूर, भिडी, ईसापूर, देवळी व परिसरातील गावात झाडे उन्मळून पडली. घरावरील छप्पर उडाले, विद्युत पोल खाली पडून तारा विखुरल्या. काही मिनिटांच्या अवधीतच या वादळाने हाहाकार माजविला.पिंपळगाव (लुटे) येथील स्वस्त धान्य दुकानदार भास्कर गायकवाड यांच्या अंगावर शेतातील गोठ्याच्या टिना व दगड पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच गावातील शेषनारायण काठोके यांच्या शेतातील गोठा बैलाचे अंगावर पडल्याने एक बैल जखमी झाला. हुस्रापूर येथे चंद्रभान वड्डे यांच्या घरावर चिंचेचे झाड उन्मळून पडले. खर्डा येथील हिरामन शिवरकर व शंकर गावंडे यांच्या घराचे टिनाचे छप्पर उडाले. गावातील अनेकांचे यामध्ये नुकसान झाले.रत्नापूरचे सरपंच अयुबअली पटेल यांच्या गोठ्याचे छप्पर उडाले. बोपापूर वाणी येथे माणिक कोंबे व अमर अंबरकर यांच्या घराचे व गोठ्याचे छप्पर उडाले. अनेकांच्या घराच्या टिना उडून नुकसान झाले. अनेक गावातील विद्युत पोल उन्मळून पडल्यामुळे कोळोख पसरला आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तहसीलदार तेजस्वीनी जाधव व सहकारी अधिकाऱ्यांनी नुकसानीचा आढावा घेतला.दोन तास विद्युत पुरवठा ठप्पहिंगणघाट- तालुक्यात विजेच्या कडकडाटासह सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ३० घराचे अंशत: व एका घराचे पुर्णत: नुकसान झाले. यात जवळपास ४ लाखांच्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे. जवळपास एकतास झालेल्या या पावसाची १९.२ मि.ली. नोंद झाली आहे. जवळपास सर्वच ठिकणाचा वीज पुरवठा दोन तास खंडित होता.गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आकस्मिक आगमनाने अनेकांची तारांबळ उडाली. या वादळी पावसामुळे अनेक गावातील मोठमोठी वृक्ष कोलमडून पडली. अल्लीपूरात झाड कोसळून एका घराचे पूर्णत: नुकसान झाले. येणोरा येथे एक, पारडी एक, हिंगणघाट आठ, भगवा एक, नुरापूर तीन, दोंदुडा सात, गंगापूर तीन, खापरी तीन घरे, बोरखेडी येथे एक गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. तर सोनेगाव (धोटे) येथे एका घरावर झाड कोसळून एका घराचे अंशत: नुकसान झाले. सदर वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती नायब तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली. या वादळी पावसाने कोणतीही जीवहानी झाली नाही. शहरात आजही ढगाळ वातावरण कायम आहे. गिरड परिसराला वादळी पावसाचा तडाखागिरड - गुरूवारी सायंकाळी गिरड व आसपासच्या परिसराला वादळी वारे व पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. यामध्ये अनेकांच्या घरावरील टिना, छपरे उडून गेली. तसेच सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्रभर अंधाराचे साम्राज्य होते. येथील भाऊराव तेलरांधे यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम येथील कन्या विद्यालयाच्या मैदानावर होता. त्यासाठी मोठा मंडप घालण्यात आला होता. परंतु वादळाने हा संपूर्ण मंडप उडून गेला. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.