आॅनलाईन लोकमतवर्धा : ‘तेजोमय नादब्रह्म’ या गीताने केतकी माटेगावकर यांनी मराठी गीत कार्यक्रमाला सुरूवात केली. या गीताने उपस्थितांची मने जिंकली. हे प्रियकरा, मुड सांभाळ, तुºयाला ग आला आदी गीतांनी तरूणाईला नाचायला भाग पाडले. लग जा गले, बाहो में चले आ आदी जुन्या गाजलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. केतकीने गायलेले ‘मला वेड लागले प्रेमाचे’, हे गीत तर तरूणाईने डोक्यावरच घेतले. या गीतावर तरूणाई थिरकली. केतकीला सुप्रसिद्ध गायक अशी वैद्य व मृदूल पांडे यांची साथ लाभली.वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्धा कला महोत्सवामध्ये केतकी माटेगावकर यांचा सदाबहार मराठी गीतांचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष आ.डॉ. पंकज भोयर, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष उदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, वर्धा कला महोत्सव अध्यक्ष संदीप चिचाटे, अशोक झाडे, वरुण पांडे, अभिजीत श्रावणे, शीतल भोयर, तपस्या सराफ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले. की बोर्डवर परिमल जोशी, पवन मानवटकर, तबला प्रमोद बावणे, ढोलक अनिकेत दहेकर, आॅक्टोपॅड विशाल दशसहस्त्र, गिटार सचिन मुळे, बासरी अरविंद उपाध्ये यांनी साथ दिली. कार्यक्रमाच्या पूर्वीचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर प्रास्ताविक संदीप चिचाटे यांनी केले.वर्धा कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी अतुल झाडे, विनोद ताकसांडे, आशिष काळमेघ, अजय वरटकर, सचिन होले, निलेश किटे, नरेंद्र लोणकर, गौरव ओंकार, अजय झाडे, पवन राऊत, रसिक जुमडे, शुभम झाडे, प्रफुल गायकवाड, अनिल कुकुर्डे, गौरव जाधव, अजय ठाकरे, गौरव बन्नगरे, नितीन पोहनकर, पवन तराळे, संघर्ष तेलंग, दत्ता बाहुले, तेजस, श्रेयस काळे, अनिकेत ठाकरे, दिनेश येलोरे, यश बोरीकर आदी सहकार्य करीत आहेत.वर्धेकरांसाठी ठरतेय पर्वणीवर्धा कला महोत्सव समितीद्वारे दरवर्षी वर्धा कला महोत्सवचे आयोजन केले जाते. यात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जातात. शनिवारी पार पडलेल्या केतकी माटेगावकर यांच्या मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वर्धेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. कला महोत्सव वर्धेकरांसाठी पर्वणीच ठरली आहे.
‘मला वेड लागले प्रेमाचे’वर थिरकली तरूणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:33 PM
‘तेजोमय नादब्रह्म’ या गीताने केतकी माटेगावकर यांनी मराठी गीत कार्यक्रमाला सुरूवात केली.
ठळक मुद्देवर्धा कला महोत्सवातील आयोजन : बहारदार गीतांना रसिकांची मनमुराद दाद