लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर कृती करून सरकार चालवित असल्याचा देखावाच काँग्रेसने केला. त्यामुळेच सध्या त्यांचे हे हाल झाले आहेत. गांधींच्या विचारावर त्यांनी कधीच सरकार चालविले नाही. महात्मा गांधी हे केवळ काँगे्रसचे नसून देशासह जगाकरिता आदर्श आहेत. काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.भारतीय जनता पार्टीच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून वर्धा शहरातून गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात झाली. यावेळी ना. बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सेवा दलाच्यावतीने काढण्यात आलेल्या शांतीचा संदेश देणाऱ्या पदयात्रेच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. समाजातील शेवटच्या घटकासाठी सरकारच्या पदाचा वापर आम्ही करण्याचा संकल्प या यात्रेच्या निमित्ताने केल्याचे याप्रसंगी ना. बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या संकल्प यात्रेत खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, माधव कोटस्थाने, माजी खासदार विजय मुडे, अर्चना वानखेडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेवक निलेश किटे, जयंत सालोडकर, पवन राऊत, मिलिंद भेंडे, शरद आडे, वरुण पाठक, वंदना भूते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:18 PM
काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ठळक मुद्देभाजपची गांधी संकल्प यात्रा