लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.महिला व किशोरी मुलींना स्वयंरोजगारातून सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांच्या कल्पकतेतून जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने सेलू येथील पंचायत समितीच्या प्रांगणात स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत सयाजी महाराज, जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, उपसभापती सुनिता अडसड, नगराध्यक्ष शारदा माहुरे, जि.प. सदस्य विनोद लाखे, सुमित्रा मलघाम, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अशोक कलोडे व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी संत सयाजी महाराज म्हणाले, स्त्री ही आदिशक्ती आहे. स्त्रीमुळेच आपण या पृथ्वीतलावर आलो असून त्याचे कार्य हे महान आहे. तसेच महिलांनी चुल आधि मुल यापर्यंतच मर्यादीत न राहता खंबीरपणे उभे राहून रोजगार निर्मितीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन सभापती जयश्री खोडे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे, अॅड. अनिता ठाकरे व शैलेश पांडे यांनी विविध मुद्दयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख संजय चौधरी यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यपालन अधिकारी इलमे यांनी मानले. यशस्वीतेकरिता गट विकास अधिकारी संजय पाटील, प्रकल्प अधिकारी एस.एम. सडमाके, विस्तार अधिकारी दादाराव राठोड, ज्योती सोनोने, मंगला राऊत, ज्योती धनवीज, माधुरी गणवीर, गौरव हजारे, मेश्राम, आंबटकर यांनी सहकार्य केले.लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपमाझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये हमदापूर येथील तक्षा विनोद गायकवाड, श्रेया नितेश इरपाते, योगिनी प्रवीण पाटील, गौरी विनोद मांडवकर, पिंपळगांव येथील दुर्गा संजीव चांदोरे, पुणम उमेश केंडे, चांनकीच्या सान्वी प्रशांत भस्मे, वैष्णवी कमलाकर वाकुलकर तर वानोडा येथील पुजा उमेश लिचडे यांचा समावेश आहे.
उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारल्यास व्यवसायाची वृद्धी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:40 PM
रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देपंकज भोयर यांचा विश्वास : महिला व किशोरी मुलींकरिता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा