ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : केव्हातरी तक्षशिला, नालंदा सारखी विश्वविद्यालये असलेला आपला भारत देश आजच्या संगणकयुगात मात्र शिक्षणक्षेत्रात माघारत चाललेला आहे. इथल्या विद्यापिठाचा, शिक्षणाचा दर्जा अगदी खालावत चाललेला आहे. शिक्षण क्षेत्रात सगळीकडे अगदी सावळागोंधळ निर्माण झाला असून हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र भ्रष्टाचाराने पोखरले गेले असताना कुणीच कसा आवाज उठवित नाही असा प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थी-शिक्षक-पालक जागरुक झाल्यास शैक्षणिक विकास हमखास होईल, असे प्रतिपादन डॉ. दामोधर गोल्हर यांनी केले.अभिनव विचार मंच हिंगणघाट द्वारा आयोजित ‘शिक्षण-परिस्थिती व आव्हाने एक सुसंवाद या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र डागा तर व्यासपीठावर हरिहर पेंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान हरिहर पेंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रात सध्या असलेली विविध आवाहने यावर प्रकाश टाकला. शिवाय शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी सर्वानी पुढे येण्याचे आवाहनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन सुकळकर यांनी केले. संचालन मिलींद सावरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद वाघमारे यांनी मानले.
विद्यार्थी-शिक्षक-पालक जागरुक झाल्यास शैक्षणिक विकास हमखास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:17 AM
केव्हातरी तक्षशिला, नालंदा सारखी विश्वविद्यालये असलेला आपला भारत देश आजच्या संगणकयुगात मात्र शिक्षणक्षेत्रात माघारत चाललेला आहे. इथल्या विद्यापिठाचा, शिक्षणाचा दर्जा अगदी खालावत चाललेला आहे.
ठळक मुद्देदामोधर गोल्हर : अभिनव विचार मंचचा विशेष कार्यक्रम