शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

शेतीला जोड दिल्यास आर्थिक स्तर उंचावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:35 PM

सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : जि. प. सभागृहात कृषिदिनाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.जि.पं.च्यावतीने तेथील सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, जि.प. मुख्य कार्य पालन अधिकारी अजय गुल्हाणे, कृषी व्यवसाय संघाचे रवी शेंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ. उंबरकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कोण कोणत्या उपाय योजना कराव्या याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुकेश भिसे पारंपारिक शेती जशी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करतो तशीच आधुनिक शेती ही शेतकऱ्यांनी अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनात करावी, असे सांगितले.जि.प. सदस्य तेलंग म्हणाले की, कमी खर्चाची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. विद्या मानकर यांनी कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कृषी विकास अधिकारी धर्माधिकारी यांनी कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) चा शेतात जास्तीत जास्त वापर करावा असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान वर्धा तालुक्यातील चार व सेलू तालुक्यातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी संजय बमनोटे यांनी केले तर आभार कृषी विकास अधिकारी रवींद्र धर्माधिकारी यांनी मानले. जि.प.च्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला फुसाटे, धनवीज, तेलंग, सावरकर, डॉ. उंबरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांच्यासह मोठ्या संख्यने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता जि.प.च्या कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसFarmerशेतकरी