पाक इबादतचा रमजान : समाजबांधवांचा मोठा सहभागगिरड : रमजानच्या पवित्र महिन्यात स्थानिक पोलीस स्टेशन व शांतता कमिटीच्या वतीने येथील एका कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुस्लीम बांधवांसह इतरही नागरिक यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समुद्रपूर ठाणेदार आर. टी. चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच चंदा कांबळे, ठाणेदार एस. वाय. थोटे, पं. स. सदस्य मुरलीधर पर्बत, शांतता कमिटीचे अध्यक्ष रहिम शेख, अब्दुल कादीर, सलिम पटेल, मौलाना जामा मज्जीत परवेज काजी, हमीद पटेल आदी उपस्थित होते. रमजान हा महिना पाक म्हणजेच पवित्र समजला जातो. रमजानमध्ये रोजे ठेवून स्वत:मधील इच्छाशक्ती तपासली जाते. अल्लाहचा पवित्र संदेश जनमानसात पोहोचविण्यावर भर दिला जातो. तसेच कुराण पठण करून पवित्र आचरण करण्यावर रमजान महिन्यात भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध पदार्थांचा आनंद यावेळी सर्वांनी घेतला. प्रास्ताविक ठाणेदार एस.वाय. थोटे यांनी केले. संचालन प्रेमचंद बावणे, तर आभार जमदार गजानन घोडे यांनी मानले. मुस्लीम समाजातील ज्येष्ठ बांधवाचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी दादाजी शंभरकर, शकील शेख, नईम काजी, शेख नईम, रियाज पटेल, सोहेल काजी, बब्बू पटेल, इस्त्राईल शेख, मकबुल रहीम शेख, लाखे, नागोसे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)
पोलीस ठाणे व शांतता कमिटीच्यावतीने इफ्तार पार्टी
By admin | Published: July 02, 2016 2:23 AM