शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तब्बल 50 हजार वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 5:00 AM

अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अवैध पद्धतीने तोडलेली झाडांच्या लागडांची कुठलीही परवानगी न घेताच शासकीय सुटीच्या दिवशी वाहतूक केली जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

अमोल सोटेलाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यात सक्रिय झालेल्या लाकूड तस्करांच्या टोळीने वर्षभराच्या काळात अप्पर वर्धा, पाटबंधारे, महसूल, तसेच वनविभागाच्या जागेवरील तब्बल ५० हजारांहून अधिक डेरेदार वृक्षांची अवैध कत्तल केली आहे. इतकेच नव्हे, तर अजूनही छुप्या पद्धतीने डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. पण मूग गिळून असलेला स्थानिक वनविभाग साधी चौकशी करण्याचीही तसदी घेत नसल्याने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या लाकूड तस्करांना पाठीशी तर घालत नाही ना अशी शंका वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी उपवनसंरक्षकांनी लक्ष देत वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.तालुक्यात सहा आरामशीन-    तालुक्यात सहा आरामशीन आहेत. असे असले तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने लाकडाची कटाई होत असल्याचे दिसून येते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लाकूड कापण्याची परवानगी राहत असताना काही आरामशीन व्यावसायिक रात्रीलाही लाकूड कटाई करीत असल्याने त्याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दुर्लक्षित धोरण ठरते खतपाणी देणारे-    अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अवैध पद्धतीने तोडलेली झाडांच्या लागडांची कुठलीही परवानगी न घेताच शासकीय सुटीच्या दिवशी वाहतूक केली जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

तालुक्यात दोन वनपरिक्षेत्र कार्यालय-    तालुक्यात आष्टी व तळेगाव असे दोन वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या दोन्ही वनक्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. तालुक्यातील शेतकरी जगावा या हेतूने विविध ठिकाणी सिंचनासाठी कॅनलची व्यवस्था करण्यात आली. पण, याच कॅनलच्या दुतर्फा असलेली डेरेदार बाभूळीचे झाडे तोडण्यात आली असली तरी अप्पर वर्धा आणि पाटबंधारे विभाग चूप आहे.

व्यावसायिकांशी साटेलोटे-   तालुक्यात सक्रिय झालेल्या लाकूड तस्कराचे तालुक्यातीलच काही आरामशीन व्यावसायिकांसोबत साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उपवनसंरक्षकांनी आष्टी तालुक्यातील प्रत्येक आरामशीनला भेट देत तेथील लाकूड योग्य मार्गानेच आले काय याची शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या भागातील वृक्षांची झाली कत्तल-    तालुक्यात सक्रिय झालेल्या लाकूड तस्करांच्या टोळीने शासकीय सुटीचे दिवस निवडून तालुक्यातील माणिकवाडा, डोंगरगाव (रिठ), अंतोरा, लहान आर्वी, वाघोली, शिरसोली, मोई, मुबारकपूर, पोरगव्हाण पंचाळा, आदी भागातील विविध प्रजातींची डेरेदार वृक्ष अवैध पद्धतीनेच तोडली आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग