शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अवैधरीत्या साठवणूक केलेल्या रेतीचा लिलाव

By admin | Published: June 28, 2014 12:33 AM

हिंगणघाट : येथील वणा नदी जवळच्या शितला माता मंदिर परिसरात रेती माफीयांनी अवैधरित्या रेतीचा साठा केला होता.

  हिंगणघाट : येथील वणा नदी जवळच्या शितला माता मंदिर परिसरात रेती माफीयांनी अवैधरित्या रेतीचा साठा केला होता. हा साठा तहसीलदार दीपक करंडे व महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केला. त्या रेतीसाठ्याचा शुक्रवारी लिलाव करण्यात आला. हा लिलाव मे. गोल्हर जिनिंग अ‍ॅण्ड आईल इंडस्ट्रीजने १८ लाख रुपयांत खरेदी केला. यात शासनाला खर्च वजा जाता १५ लाख ४० हजाराचा निव्वळ महसूल तालुक्याला प्राप्त झाला. वना नदीच्या शहरालगत असलेल्या रेती घाटातील रेती माफीयांकडून अवैधरित्या वाहतूक करून शितला मातता मंदिर परिसरातील विस्तृत जागेवर साठवून ठेवली होती. या रेतीची वाटेल तेव्हा उचल करून ती नागरिकांना विकण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार करंडे यांना मिळाली. त्यांनी सदर रेती बद्दल आठ दिवसाचा जाहिरनामा काढुन रेतीबाबतच्या हक्काची माहिती मागविली. असे असले तरी त्या रेतीवर आपला हक्क आहे असे सांगणारे कोणीच समोर आले नाही. त्यामुळे सदर रेती अवैध असल्याचे जाहीर करीत ती तहसील कार्यालयाच्या परिसात आणण्यात आली. या दरम्यान मंडळ अधिकारी कावळे, व्ही.एच. उके, आर.टी. उके, तलाठी वकोरीया, दाते आदींनी दिवसरात्र जागता पहारा देवून संभाव्य चोरटी वाहतूक रोखून धरली. त्यांना रेती वाहतुकीसाठी निनावे यांनी सहकार्य केले. सदर ५३२ ब्रास रेतीसाठा जाहीर लिलावाद्वारे विकण्याची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच जाहिरनामा काढुन शुक्रवारी त्याचा लिलाव करण्यात आला. या लिलावात एकूण पाच जण सहभागी होते; परंतु प्रत्यक्षात चार जणांनी बोलित सहभाग घेतला. ५३२ ब्रास रेती आधारभूत किंमत ११ लाख १७ हजार २०० रुपये असताना स्पर्धात्मक बोलीतून शेवटी गोल्हर जिनिंग अ‍ॅण्ड आईल प्रा.लि. हिंगणघाटने तो १८ लाख रुपयात खरेदी केला. एक चतुथांश रक्कम चलान द्वारा शासन खजिन्यात जमा केली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती साठा विरोधरात धडक मोहीम राबविल्याने शासनाला लाखोचा महसूल प्राप्त झाला. या लिलावामुळे व महसूल विभागाच्यावतीने सुरू असलेल्या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून कारवाई अशीच सुरू ुठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी) अवैध रेतीची वाहतूक; नऊ ट्रॅक्टर जप्त येथील तहसीलदार दीपक करंडे यांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता वणा नदीच्या गणेशपूर रेती घाटावर सहकाऱ्यांसोबत धाड घालून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रॅक्टरला ताब्यात घेतले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. हे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या आवारात उभे आहेत. रात्री व पहाटे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार करंडे यांना मिळाली. त्यामुळे करंडे यांनी मंडळ अधिकारी दिलीप कावळे, रविंद्र चकोले, तलाठी नकोरीया, अन्न पुरवठा निरीक्षक टेकाडे, शिपार्ई सुनील आत्राम व बोरगाव येथील कोतवाल बालू सातघरे यांना सोबत घेत पहाटे ५ वाजताचे दरम्यान ही धाड घातली. यावेळी नदीपात्रातून रेतीची वाहतूक करताना नऊ ट्रॅक्टर्स मिळून आले. या ट्रॅक्टर्सला नदी पात्रातच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेवून ट्रॅक्टर मधील रेती नदी पात्रात रिकामी केली व ट्रॅक्टरला चलान करून तहसील कार्यालय परिसरात आणले. यात शेख महंमद शेख नुर यांचा एम.एच.३२ पी. ३५५७, नामदेव डांगरे यांचा एम.एच.३२ एफ.२०५, अब्दुल जावेद कुरेशी यांचा एम.एच.३२ पी ९५६२, प्रशांत घवघवे यांचा एम.एच.२९/७१८३, सुनील ढोकपांडे यांचा एम.एच.३२ पी.९४२, धनपाल डोंगरे यांचा एम.एच.३२ पी ७९०९, महेश घुमडे यांचा एम.एच.३२ पी.९२४, राहुल निखाडे एम.एच.३२ नंबर नाही. प्रकाश गाळे यांच्या एम.एच.३२ ए.२९७५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.