सुधिर खडसे - समुद्रपूरयेथील पोलीस ठाण्याला ठाणेदार म्हणून आयपीएस अधिकारी लाभले आहे. त्यांच्या काळात येथील अवैध वाहतूक व गुन्हेगारीवर आळा बसणार असे सर्वसामान्यांना वाटत असताना उलटेच झाले. त्यांच्या काळात अवैध व्यवसायत वाढ झाली आहे. त्यामुळे आयपीएस दर्जा असलेल्या या ठाणेदारांकडून जनतेचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.समुद्रपूर, जाम, गिरड, नंदोरी, कोरा येथे अवैध वाहतूक सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या तालुक्यात केवळ अवैध वाहतूक नाही तर दारू व्यवसाय सुद्धा जोरात सुरू आहे. येथे असलेल्या अवैध व्यवसायातून अनेक ठाणेदार माया गोळा करून गेलेत. यामुळे येथील अवैध व्यवसाय बंद होणे शक्य नसल्याचे नागरिकांना वाटत होते. अशात आयपीएस दर्जा असलेला अधिकारी येथे ठाणेदार म्हणून रूजू झाला. सदर आयपीएस अधिकारी येथील अवैध व्यवसायावर आळा बसवणार असे तालुकावासीयांना वाटू लागताच येथे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. समुद्रपूर येथील झेंडा चौक व तहसील कार्यालय परिसरात अवैध वाहतूक करणारी वाहणे उभी असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. आसन क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी कोंबळे जातात. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर दिवसाढवळ्या घडत असतो. यावर पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेवून गप्प राहते. येथील ठाण्यासमोरून सुद्धा सर्रास अवैध वाहतूक होतांना दिसते. असे असले तरी गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत.
अवैध वाहतूक व गुन्हेगारीत वाढ
By admin | Published: June 24, 2014 12:01 AM