शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

‘ड्राय झोन’ जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:24 AM

शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. या तीन जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे तीन जिल्हे राज्यात आदर्श जिल्हे म्हणून ओळखल्या जावू शकते.

ठळक मुद्देवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानचे आंदोलन : कायद्यात सुधारणा करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. या तीन जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे तीन जिल्हे राज्यात आदर्श जिल्हे म्हणून ओळखल्या जावू शकते. यामुळे ‘ड्राय झोन’ असलेल्या या जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाच्यावतीने शासनाला करण्यात आली. या मागणीकरिता वर्धेत मंगळवारी एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी समर्थक सामाजिक कार्यकर्त्याची बैठक २७ व २८ जानेवारी २०१८ रोजी चितेगाव त.मूल, जि.चंद्रपुर येथे झाली. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचविण्यात आल्यात. यात अवैध दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जात आहे. हा कायदा अतिशय सौम्य असून, याचा कोणताही वचक नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यांचा ‘ड्रायझोन’ तयार करून त्यासाठी कायद्यात वेगळी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.दारूविके्रत्याला लवकर जामीन मिळू नये यासाठी नियम कडक झाले पाहिजे, शिक्षेचे प्रमाण वाढले पाहिजे, अट्टल गुन्हेगारीवर कडक कार्यवाही झाली पाहिजे, ड्रायझोनमध्ये अवैध दारू पुरवठा करणाºया सप्लायर, डिलरवर कडक कार्यवाहीची तरतुद, दारू पिणाºयांवर कडक कार्यवाहीची तरतुद, अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन नेहमीकरिता जप्त ठेवण्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्त्व पारोमिता गोस्वामी यांनी केले. निवेदन देतेवेळी विजय सिद्धेरवार, सुलेमान बेग, गौरव शामकुळे, सुरेश कोवे, सुचिता इंगोले, गोविंद पेटकर यांची उपस्थिती होती.लोकसहभागासाठी समिती‘ड्रायझोन’ जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा याकरिता समित्या तयार करण्यात याव्या.स्वतंत्र पोलीस दलचंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय घेतांना मंत्रिमंडळाने, तिनही जिल्ह्यातील दारूबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस दलाची निर्मिती करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र मागील तीन वर्षात यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील दारू परवाने रद्द करण्यात यावेवर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी, तिथे दारू पिण्याचे परवाने दिले जात असल्याने या परवानाचा गैरफायदा घेवून अवैद्य दारू विक्री केली जात आहे. यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील दारू पिण्यांचे परवाने रद्द करण्यात यावे.व्यसनमुक्तीसाठी आरोग्य विभागात स्वतंत्र कक्ष द्यासेवाग्राम येथील रुग्णालयात डॉ. जाजू यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केदं्राचे अभ्यास करुन याच धर्तीवर ‘ड्रायझोन जिल्ह्यात’ प्रत्येक रुग्णालयात व्यसनमुक्तीचे स्वतंत्र विभाग तयार करण्यात यावे,जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब देण्याची मागणीदारूबंदी असलेल्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र फॉरेन्सिक लॅबची मागणी करण्यात आली होती व शासनस्तरावर ती मान्यही करण्यात आली होती. मात्र अजुनही ही लॅब तयार न झाल्याने अवैद्य दारू विक्रेत्यांवरील गुन्हे सिद्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे.अट्टल विक्रेत्यांवर एमपीडीए कारवाईअवैद्य दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करता यावी यासाठी त्यांचेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून तडीपार आणि मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ९३ नुसार कारवाई करावी.

टॅग्स :liquor banदारूबंदी