लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक गोलबाजार परिसरात छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.स्थानिक गोलबाजार भागात खुलेआम जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आसिफ शेख मेहबुब, उमेश सुरज पांडे, रविंद्र कांबळे, राजकुमार खेडकर, मुरलीधर शिलेदार, रियाज शेख यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख २३ हजार ९२० रुपये, सात मोबाईल व इतर साहित्य असा एकूण १ लाख ३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर जुगाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, सहा. फौजदार अशोक साबळे, पोलीस शिपाई सलाम कुरेशी, प्रमोद जांभुळकर, राजेंद्र ठाकुर, दिनेश कांबळे, हरिदास काकडे, स्वप्नील भारद्वाज, दीपक जाधव, रामकृष्ण इंगळे, हितेंद्र परतेकी, विलास लोहकरे यांनी केली. या कारवाईमुळे जुगाºयांचे धाबे दणाणले आहे.प्रमोद राठी व प्रवीण पडोळे यांच्या आशीर्वादाने सुरू होता जुगारस्थानिक गोलबाजार परिसरात खुलेआम सुरू असलेला जुगार हा प्रमोद राठी व प्रविण पडोळे यांच्या वरद हस्तामुळे सुरू असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आल्याने सदर सहा जुगाऱ्यांसह प्रमोद राठी व प्रविण पडोळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कुठेही जुगार तसेच दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:36 PM
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक गोलबाजार परिसरात छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : १.३ लाखांचा मुद्देमाल जप्त