वर्धा : मागील काही दिवसांपासून हुलकावणी देणारा वरुणराजा सध्या जिल्ह्यात जणू मुक्कामी आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मि.मी. पाऊस झाला असून, चार महसूल मंडळांत ढगफुटीसदृश, तर नऊ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.मागील २४ तासांत कुठे संततधार तर कुठे मुसळधार जोर कायम ठेवलेला पाऊस शनिवारी थांबून-थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कायम होता. सततच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवले. पुलावरून पाणी वाहत असल्याने सात जिल्हा प्रमुख मार्ग तर तीन राज्य मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. वाहतूक बंद झालेल्या जिल्हा प्रमुख मार्गांत मार्ग क्रमांक २४, ७३, १३, ६८, ४९, ४८, ४८ अ तर राज्य मार्ग ३२२, ३२९ व ०७ चा समावेश असल्याचे सांगण्यात आले.कुठल्या तालुक्यातील किती मार्गावरील वाहतूक बंद?हिंगणघाट : ०८वर्धा : ०१देवळी : ०१कुठल्या मंडळांत अतिवृष्टी?* देवळी तालुक्यातील विजयगोपाल, भिडी, अंधोरी तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, शिरसगाव, पोहणा, वर्धा तालुक्यातील वर्धा, वायफड तसेच कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.* वेगळे पाॅइंट *विजयगोपाल : ७३.३ मि.मी.भिडी : ८१.५ मि.मी.अंधोरी : ८०.३ मि.मी.वडनेर : ६६.८ मि.मी.शिरसगाव : ७६.० मि.मी.पोहणा : ८०.८ मि.मी.वर्धा : ६७.० मि.मी.वायफड : ६६.५ मि.मी.कन्नमवारग्राम : ७५.५ मि.मी.कुठल्या मंडळांत ढगफुटीसदृश?* देवळी तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली तर हिंगणघाट तालुक्यातील कानगाव या एकूण चार महसूल मंडळात मागील २४ तासांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.* वेगळे पाॅईंट *देवळी : ९८.३ मि.मी.पुलगाव : ९५.८ मि.मी.गिरोली : ११८.० मि.मी.कानगाव : ११६.५ मि.मी.
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारासततच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही जलाशयांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात नद्यांच्या काठांवर तब्बल २१४ गावे असून त्यांच्यावर जिल्हा आणि तालुका प्रशासनाचा वॉच आहे.
दोन प्रकल्पांतून होतोय पाण्याचा विसर्ग* सततच्या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ होत पोथरा आणि लालनाला या दोन प्रकल्पांतून सध्या पाण्याचा विसर्ग होत आहे.* डोंगरगाव आणि पंचधारा हे दोन प्रकल्प ओव्हर फ्लोच्या उंबरठ्यावर आहेत. पाऊस कायम असल्याने हे दोन्ही प्रकल्प कधीही फुल्ल होत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होण्याची शक्यता आहे.
कुठल्या तालुक्यात किती पावसाची नोंदआर्वी : ३८.४ मि.मी.कारंजा : ४८.० मि.मी.आष्टी : ३६.५ मि.मी.वर्धा : ६१.२ मि.मी.सेलू : ३९.७ मि.मी.देवळी : ९१.४ मि.मी.हिंगणघाट : ६३.२ मि.मी.समुद्रपूर : २३.१ मि.मी.
नागझरी नाल्यावरील पुल गेला वाहूनवर्धा तालुक्यातील पवनार-सेवाग्राम रोडवर नागझरी नाल्यावरील पूल पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेटिंग करून वाहतूक बंद करण्यात आली आहे.लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजू खचल्यासेलू तालुक्यातील धानोली (मेघे)-बेळगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला आहे. या मार्गावरून फारशी वाहतूक होत नसली तरी मार्गाचा वापर शेतकरी व मजूर मुख्यत्वे करतात. पर्यायी मार्ग ३०० मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे.