शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?
2
"वारे उबाठा तुझं हिंदुत्व...! आरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निडून देतो, पण...; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
3
अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण
4
ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह
5
मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
7
'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला
8
कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन
9
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
10
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
11
किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल
12
१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ
13
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
14
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
15
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
16
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
17
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
19
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
20
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले

वर्ध्यात छाननीत २७ अर्ज ठरले अवैध; ४४८ उमेदवारांचे अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 7:55 PM

हिंगणघाट बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवारांनी अर्ज सादर केले.

महेश सायखेडे

वर्धा : जिल्ह्यातील सात बाजार समितींच्या संचालक पदांच्या १२६ जागांसाठी एकूण ४७५ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले. याच अर्जांची बुधवारी छाननी केल्यावर तब्बल २७ अर्जांत विविध त्रुट्या आढळल्याने ते अवैध ठरविण्यात आले आहेत. तर ४४८ नामनिर्देशन अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.वर्धा बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी एकूण ७३ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीत अवैध ठरले. पुलगाव बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी एकूण ९४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले.

त्यापैकी १३ अर्ज छाननीत अवैध ठरले. हिंगणघाट बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवारांनी अर्ज सादर केले. छाननी प्रक्रियेत चौघांचे अर्ज अवैध ठरले. तर सिंदी रेल्वे बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी एकूण ७० इच्छुकांनी अर्ज सादर केले असून छाननीत एकाचा अर्ज अवैध ठरला. समुद्रपूर बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ४८ उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यापैकी दोघांचे अर्ज अवैध ठरले. आष्टी बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६१, आर्वी बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ६५ उमेदवारांनी अर्ज सादर केले हाेते. या दोन बाजार समितीत प्रत्येकी दोन अर्ज अवैध ठरले.छाननीनंतर कुठल्या बाजार समितीत कुठल्या मतदारसंघात किती उमेदवार?बाजार समिती : सहकारी संस्था मतदारसंघ : ग्रामपंचायतींचा मतदारसंघ : व्यापारी/अडते मतदारसंघ : हमाल/मापारी मतदारसंघ* पुलगाव : ४८ : २६ : ४ : २* वर्धा : ४१ : १७ : ७ : ५* आष्टी : ३५ : १६ : ६ : २* सिंदी रेल्वे : ३७ : २३ : ७ : २* आर्वी : ३८ : १६ : ६ : ३* समुद्रपूर : ३१ : १२ : २ : १* हिंगणघाट : ३६ : १५ : २ : ७२१ एप्रिलला मिळणार निवडणूक चिन्हबाजार समितींच्या संचालकपदासाठीच्या निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांना ६ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत आपला अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना २१ एप्रिलला निवडणूक चिन्ह वितरित करण्यात येणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा